मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: फराह खान टीना दत्तावर संतापली; भर कार्यक्रमातून निघाली बाहेर! पाहा Video
Bigg Boss 16
Bigg Boss 16

Bigg Boss 16: फराह खान टीना दत्तावर संतापली; भर कार्यक्रमातून निघाली बाहेर! पाहा Video

27 January 2023, 13:24 ISTHarshada Bhirvandekar

Bigg Boss 16: वीकेंड का वार’मध्ये एलिमिनेशन सुरू होण्याआधीच फराह खान आणि टीना दत्तामध्ये खडाजंगी होताना दिसली.

Bigg Boss 16: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १६’ आता महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान आता शोमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी चांगलीच चढाओढ होताना पाहायला मिळत आहे. नुकताच या शोचा ‘वीकेंड का वार’ हा भाग प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये चांगलाच हंगामा पाहायला मिळाला. या आठवड्यात फराह खान ‘बिग बॉस १६’चा ‘वीकेंड का वार’ हा एपिसोड होस्ट करताना दिसली. यावेळी एलिमिनेशन सुरू होण्याआधीच फराह खान आणि टीना दत्तामध्ये खडाजंगी होताना दिसली.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या आठवड्यात सलमान खानने टीना आणि शालीनची चांगलीच शाळा घेतली होती. यावेळी सलमान खानने दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या आठड्यात शालीनची साथ सोडून टीना दत्ता प्रियांकासोबत गेम प्लॅनिंग करताना दिसली. तर, प्रियांकाने देखील शालीनला त्रास देण्यास सुरुवात केली होती. यात टीना दत्ता तिला साथ देत होती. एकीकडे शालीन मानसिक समस्येशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे टीना आणि प्रियंका सतत त्याला त्रास देत होत्या. यामुळे शालीन अनेकदा घरात गोंधळ घालताना दिसला.

या संपूर्ण प्रकरणावर फराह खानने टीना दत्ताची चांगलीच शाळा घेतली. तर, प्रियांकाला देखील फटकारले. टीना दत्ता तिच्या दाताच्या दुखण्यामुळे हैराण झाली होती. याच कारणामुळे तिला घराबाहेर जायचे होते. यावर फराह खान म्हणाली की, ‘टीनाच्या दाताच्या दुखण्याचा तुम्ही खूप बाऊ केलात आणि आता तिला घरातून बाहेर जायचे आहे. पण, शालीनची मानसिक अवस्था खराब आहे, हे माहित असताना देखील तुम्ही त्याची थट्टा केली. हे वागणं अतिशय घृणास्पद होतं. तेव्हा तुम्हाला त्याची दया आली नाही.’

यानंतर टीनाने देखील स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. टीना म्हणाली की, ‘हे अतिशय चुकीच्या पद्धतीने सादर केलं जात आहे. आम्ही असं काहीही चुकीचं वागलेलो नाही.’ मात्र, टीनाचं हे स्पष्टीकरण फराहला फारसं आवडलं नाही. फराहने टीनाला शांत बसण्यास सांगितले. मात्र, तरीही टीनाचं बोलणं अविरत सुरू होतं. यानंतर फराहने तिला निघून जाण्याची धमकी देखील दिली. त्यावर टीनाची प्रतिक्रिया पाहून फराह संतापली आणि तिने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. दोघींमधला हा वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे.