Rakhi Sawant Marriage controversy: अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. आदिल खान दुर्राणीला डेट केल्यानंतर राखीने मे २०२२मध्ये त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले होते. तर लग्नाच्या अनेक महिन्यांनंतर जानेवारी २०२३मध्ये राखीने आदिलसोबत तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. राखीच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही धक्काच बसला होता. मात्र, या लग्नानंतर देखील राखीच्या आयुष्यात मोठा ड्रामा झाला आहे.
राखीने पती आदिल खान दुर्राणीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सध्या आदिल तुरुंगात असून जामिनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान, राखीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी आदिलचं नाव पुसताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राखी सावंतचा हा नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी खूपच उदास दिसत आहे. राखी म्हणते की, 'मला माझ्या पैशांनी खरेदी केलेली कार वापरू द्या. माझे पैसे या गाडीत गुंतवलेले असताना मी ऑटोने का यावे? तो तुरुंगात गेला तेव्हा, माझ्याकडे गाडीची चावी होती. बघा त्याने गाडीवर देखील स्वतःचे नाव लिहिले होते.'
यानंतर कारवर आदिलचे नाव लिहिलेले दिसते आणि यानंतर राखीने गाडीवरून आदिलचे नाव काढून टाकले. यावेळी, राखीने गाडीवरील भारताचा झेंडा मात्र काढलेला नाही. राखीच्या या कृत्यानंतर तिचे चाहते सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादांमुळे खूप चर्चेत आहे. राखीने पती आदिलवर फसवणूक, मारहाण आणि पैशांची हेराफेरी असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीच्या तक्रारीनंतर तिचा पती आदिल खान याला अटक करण्यात आली. आदिल सध्या तुरुंगात आहे.