मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant: आदिलला तुरुंगात भेटायला गेलेली राखी सावंत आणखी संतापली; बाहेर आल्यावर म्हणाली...

Rakhi Sawant: आदिलला तुरुंगात भेटायला गेलेली राखी सावंत आणखी संतापली; बाहेर आल्यावर म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 20, 2023 04:53 PM IST

Rakhi Sawant meets Adil Durrani: राखीच्या तक्रारीनंतर तिचा पती आदिल खान याला अटक करण्यात आली. आदिल सध्या तुरुंगात आहे.

Rakhi Sawant
Rakhi Sawant

Rakhi Sawant meets Adil Durrani: अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादांमुळे खूप चर्चेत आहे. राखीने पती आदिलवर फसवणूक, मारहाण आणि पैशांची हेराफेरी असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीच्या तक्रारीनंतर तिचा पती आदिल खान याला अटक करण्यात आली. आदिल सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, राखी सावंत पती आदिलला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचली होती. पण, बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा दिसत होती. तर, ती संतापलेली देखील पाहायला मिळाली.

राखी सावंतचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखीचे हे व्हिडीओ आदिलला भेटल्यानंतरचे आहेत. यावेळी मीडियाने राखीला विचारले की, तिला आदिलच्या कुटुंबाकडून काही कॉल किंवा मेसेज आला आहे का? ज्यावर राखीने नाही असे उत्तर दिले. यावेळी राखी म्हणाली की, आदिलच्या कुटुंबाला माहित आहे, त्यांचा मुलगा कसा आहे आहे. तो जेलमधून स्वतःची सुटका करून घेईल. पण तो कसा सुटतो ते मीही आता बघणारच आहे. ही राखी सावंतची केस आहे. त्याचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणार आहे. मी शांत बसणार नाही.

राखी म्हणाली की, ती लॉकअपमध्ये आदिलला भेटायला गेली होती. यावेळी तिने आदिलला तिच्या पैशांबद्दल देखील विचारले. राखीने आदिलकडे नवीन कारचीही चौकशी केली. यावेळी आदिल तिच्याशी खूप उद्धटपणे बोलला आणि तुला काय करायचे आहे तर कर, असे म्हटले. राखी म्हणाली की, ती त्याला कधीही माफ करणार नाही.

राखीने पती आदिल खान दुर्राणी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली असून, सध्या तो तुरुंगात आहे. दरम्यान, राखी सावंत या प्रकरणात अनेक खुलासे करत आहे. नुकताच तिने आपला गर्भपात झाल्याचे म्हटले आहे. तर, डॉक्टरांनी ताकीद दिल्यानंतर देखील आदिलने न ऐकता सबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप देखील राखीने केला आहे. राखीने आदिल खान दुर्राणीवर अनेक आरोप केले आहेत. लग्न झाल्यानंतर देखील आदिलचे अफेयर सुरू असल्याचा दावा राखीने केला. या दरम्यान तिने आपली व्यथा देखील मांडली आहे. यासगळ्या दरम्यान आपला गर्भपात झाल्याचे राखीने म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग