Bigg Boss 16: साजिद खान ‘बिग बॉस १६’ फेम ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांमध्ये रंगल्या चर्चा!
Sajid Khan Dating: साजिद खान सध्या ‘बिग बॉस १६’च्या घरातील एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
Sajid Khan Dating: ‘बिग बॉस १६’ हा वादग्रस्त शो संपला असला तरी अद्याप या शोची चर्चा चाहत्यांमधून संपलेली नाही. आता या शो मध्ये सहभागी झालेला निर्माता-दिग्दर्शक साजिद खान याच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साजिद खान सध्या ‘बिग बॉस १६’च्या घरातील एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अनेकांच्या मनात अनेक अभिनेत्रींची नावे येतील. मात्र, ही अभिनेत्री ‘मंडली’मधील नसून, दुसरीच आहे.
ट्रेंडिंग न्यूज
‘बिग बॉस १६’मध्ये अभिनेता गौतम विगसोबत रोमान्स करणारी सौंदर्या शर्मा हीचं नाव आता साजिद खान याच्याशी जोडलं जात आहे. साजिद खान आणि सौंदर्या यांच्यात काहीतरी नातं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. साजिदने सौंदर्याला त्याच्या चित्रपटातून लाँच करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील बोलले जात आहे.
साजिदने सौंदर्याला त्याच्या आगामी चित्रपटाच्या एका गाण्यात झळकण्याची संधी दिली आहे. तब्बल ४ वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणारा साजिद लवकरच त्याचा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री शहनाज गिल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटात सौंदर्याला देखील संधी मिळणार आहे. यामुळेच आता साजिद खान आणि सौंदर्याचे नाव एकत्र जोडले जात आहे.
‘बिग बॉस १६’ या शोमध्येच सौंदर्या आणि गौतमचे ब्रेकअप झाले होते. त्याचवेळी तिची जोडी साजिद खानसोबत जुळली होती. साजिद आणि सौंदर्याच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये आता कितपत तथ्य आहे, हे फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे. मात्र, चाहते या बातमीमुळे खूश झाले आहेत. अब्दू रोजिकच्या पार्टीत सौंदर्या देखील मंडली गँग सोबत धमाल करताना दिसली. या आधी साजिद खानचे नाव जॅकलिन फर्नांडिससोबत जोडले गेले होते. साजिदचे गौहर खानसोबतही प्रेमसंबंध होते. आता साजिद आणि सौंदर्याच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. डेंटिस्ट-अभिनेत्री सौंदर्या हिला लोक ‘गोल्ड डिगर’ म्हणत ट्रोल करत आहेत.