मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hera Pheri 3: पुन्हा दिसणार राजू-बाबू भैय्याची धमाल! ‘हेरा फेरी ३’च्या शूटिंगला सुरुवात

Hera Pheri 3: पुन्हा दिसणार राजू-बाबू भैय्याची धमाल! ‘हेरा फेरी ३’च्या शूटिंगला सुरुवात

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2023 02:35 PM IST

Hera Pheri 3 Latest Update: प्रेक्षकांना 'राजू', 'श्याम' आणि 'बाबुराव' ही आयकॉनिक जोडी लवकरच पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Hera Pheri 3
Hera Pheri 3

Hera Pheri 3 Latest Update:हेरा फेरी ३’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची अपडेट जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल स्टारर 'हेरा फेरी ३' हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. 'हेरा फेरी 3' संदर्भात अनेक अपडेट्स सध्या सातत्याने समोर येत आहेत. आता या चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्याची अपडेट नुकतीच समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेक्षकांना 'राजू', 'श्याम' आणि 'बाबुराव' ही आयकॉनिक जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतीच अक्षय कुमारने 'हेरा फेरी 3'मध्ये काम करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांची भेट घेतली होती. मुंबईच्या एम्पायर स्टुडिओमध्ये फिरोज नाडियादवाला यांची सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत बराच वेळ मिटिंग झाली. त्यानंतर आता या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू झाले आहे.

हेरा फेरी' या चित्रपटाचा सिक्वेल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या सुपरहिट चित्रपटाच्या दोन भागांमध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र, ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याचे बोलले जात होते. अक्षय कुमारने स्वतः या चित्रपटातून बाहेर पडल्याची घोषणा केली होती. मात्र, आता अक्षयने माघार घेतली असून, पिंकविलाच्या वृत्तानुसार, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'साठी मुंबईत फिरोज नाडियादवाला यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर आता त्याने या चित्रपटात एन्ट्री घेतली आहे.

IPL_Entry_Point

विभाग