मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  DPIFF 2023 Winner: ‘द काश्मीर फाईल्स’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; तर ‘कांतारा’नेही पटकावला पुरस्कार!

DPIFF 2023 Winner: ‘द काश्मीर फाईल्स’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; तर ‘कांतारा’नेही पटकावला पुरस्कार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2023 01:54 PM IST

Dadasaheb Phalke International Film Festival 2023 Winner: 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३' नुकताच मुंबईत पार पडला आहे.

Dadasaheb Phalke International Film Festival 2023 Winner
Dadasaheb Phalke International Film Festival 2023 Winner

Dadasaheb Phalke International Film Festival 2023 Winner: 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३' नुकताच मुंबईत पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड सौंदर्यवती रेखापासून ते आलिया भट्टपर्यंत सिनेजगतातील दिग्गज सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी झाले होते. तर, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनुपम खेर, वरुण धवन आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्यासह अनेक कलाकारांनी या मनाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३'मध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पाहा पुरस्कार विजेत्यांची यादी:

सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाईल्स

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर बाल्की (चूप)

सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)

मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर: ऋषभ शेट्टी (कांतारा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: मनीष पॉल (जुगजुग जिओ)

चित्रपटांमधील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार: रेखा

सर्वोत्कृष्ट वेब सीरिज: ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’

सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स: वरुण धवन (भेडिया)

फिल्म ऑफ द इयर: आरआरआर

टेलिव्हिजन सिरीज ऑफ द इयर: अनुपमा

मोस्ट व्हर्सटाइल अॅक्टर ऑफ द इयर: अनुपम खेर (द काश्मीर फाइल्स)

टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: झैन इमाम (फना-इश्क में मरजावान)

टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: तेजस्वी प्रकाश (नागिन)

सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन (मैय्या मैनु)

सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन (मेरी जान)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद (विक्रम वेधा)

संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार: हरिहरन

IPL_Entry_Point