मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hardeek Joshi : ‘राणा दा’चं छोट्या पडद्यावर पुरागमन; ‘या’ मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Hardeek Joshi : ‘राणा दा’चं छोट्या पडद्यावर पुरागमन; ‘या’ मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2023 01:19 PM IST

Hardeek Joshi new Marathi serial: ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला अभिनेता हार्दिक जोशी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hardeek Joshi
Hardeek Joshi

Hardeek Joshi new Marathi serial: ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला अभिनेता हार्दिक जोशी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सन मराठी वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेतून हार्दिक जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तो एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत हार्दिक डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सुंदरी’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये हार्दिकचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. डोळ्याला गॉगल, सूटबुट अशा जबरदस्त लूकमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हार्दिक जोशी ‘सुंदरी’ या मालिकेत आएएस अजिंक्यची भूमिका साकारणार आहे. ‘सुंदरी’च्या ट्रेनिंगसाठी आयएएस अंजिक्यची या मालिकेत एंट्री होणार आहे. मालिकेचा हा नवा प्रोमो समोर येताच चाहते हार्दिक जोशीला शुभेच्छा देत आहेत. ‘राणा दा’ला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अक्षया देवधर हिने ‘अंजली पाठक’ तर, अभिनेता हार्दिक जोशी याने ‘राणा दा’ ही भूमिका साकारली होती. राणा दा आणि पाठक बाईंच्या या जोडीला अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. छोट्या पडद्यावरची ही लाडकी जोडी प्रत्यक्ष आयुष्यातही एकमेकांची साथ निभावत आहे. मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळवल्यानंतर अक्षया आणि हार्दिक खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे ‘राणा दा-पाठक बाई’ बनले आहेत.

लवकरच हार्दिक जोशी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शिवाय ‘सुंदरी’ या मालिकेत देखील हार्दिक जोशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. लग्नाच्या दोनच महिन्यात हार्दिक पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाला आहे. त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

IPL_Entry_Point