मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajinikanth Birthday: कुणी विष खातं, कुणी बायकोचे दागिने विकतं; रजनीकांतसाठी लोक इतके वेडे का?

Rajinikanth Birthday: कुणी विष खातं, कुणी बायकोचे दागिने विकतं; रजनीकांतसाठी लोक इतके वेडे का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 12, 2022 01:35 PM IST

Rajinikanth Birthday Special: रजनीकांत यांचा इतका मोठा चाहता वर्ग आहे की, चाहते त्यांच्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.

Rajinikanth Fans
Rajinikanth Fans

Rajinikanth Birthday Special: साऊथ सुपरस्टार अभिनेते रजनीकांत आज (१२ डिसेंबर) आपला ७२वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत यांचा इतका मोठा चाहता वर्ग आहे की, चाहते त्यांच्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. रजनीकांत यांचा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहणारे चाहते पहिल्याच दिवशी तुफान गर्दी जमवतात. रजनीकांत यांच्या लोकप्रियते इतकेच त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाचे किस्से देखील खूप प्रसिद्ध आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रजनीकांत यांचा जीव वाचवण्यासाठी चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न!

२०११मध्ये रजनीकांत यांची तब्येत प्रचंड बिघडली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या वेळी त्यांना किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती. हे चाहत्यांना कळताच एका चाहत्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मृत्युनंतर आपली किडनी रजनीकांत यांना देण्यात यावी, म्हणून त्याने इतके मोठे पाऊल उचलले होते.

थलायवाचा चित्रपट पाहणे ही शेवटची इच्छा

अनेकांच्या वेगवेगळ्या इच्छा आपण ऐकल्या असतीलच, पण रजनीकांतच्या चाहत्यांच्या इच्छा सगळ्यात हटके होत्या. तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या एका चाहत्याला कॅन्सर झाला होता. त्याला डॉक्टरांनी सक्त विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, अशा अवस्थेतही मृत्यू येण्यापूर्वी आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहता यावा म्हणून रजनीकांत यांच्या या चाहत्याने थिएटर गाठले. रजनीकांत यांचा चित्रपट पाहत असतानाच या चाहत्याला मृत्यूने गाठले.

कुणी विकले पत्नीचे दागिने, तर कुणी तिकिटासाठी मारली उडी!

रजनीकांत यांच्या अशाच एका चाहत्याने त्यांच्या वाढदिवसाची जंगी पार्टी देण्यासाठी पत्नीचे सगळे दागिने विकले होते. हा किस्सा रजनीकांत यांच्यावरील एका माहितीपटात दाखवण्यात आला होता. भारतातच नाही, तर जगभरात रजनीकांत यांची क्रेझ आहे. मलेशियातील एका मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेलेल्या चाहत्याला चित्रपटाचे तिकीट न मिळाल्याने त्याने थेट वरच्या मजल्यावर जाऊन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला होता.

IPL_Entry_Point

विभाग