मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Priyanka Chopra: लेकीसोबत प्रियांका चोप्रा व्हेकेशन मोडवर; निक जोनाससोबत खास फोटो शेअर करत म्हणाली..

Priyanka Chopra: लेकीसोबत प्रियांका चोप्रा व्हेकेशन मोडवर; निक जोनाससोबत खास फोटो शेअर करत म्हणाली..

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 20, 2022 12:02 PM IST

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या कुटुंबासोबत नाताळ साजरा करण्यासाठी खास ट्रीपवर गेली आहे. यावेळी तिने निकसोबतचा फोटो शेअर करत एक खास हटके कॅप्शन दिलं आहे.

Priyanka Nick
Priyanka Nick

Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपल्या कुटुंबासोबत नाताळ साजरा करण्यासाठी खास ट्रीपवर गेली आहे. ख्रिसमस साजरा करण्यासाठी प्रियांका पती निक जोनास आणि लेक मालती मेरी यांच्यासोबत न्यूजर्सीला रवाना झाली आहे. याची झलक तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. प्रियांकाने आपल्या कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले असून, या फोटोंमध्ये ती लेक मालती मेरी आणि पती निकसोबत दिसत आहे. यावेळी तिने निकसोबतचा फोटो शेअर करत एक खास हटके कॅप्शन दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रियांका आणि निक यांच्या घरी या वर्षाच्या सुरुवातीस चिमुकलीचं आगमन झालं आहे. निक आणि प्रियांकाने आपल्या लेकीचं नाव मालती मेरी असं ठेवलं आहे. यंदा ते आपल्या मुलीसोबत पहिला ख्रिसमस साजरा करणार आहेत. मुलीचा पहिला ख्रिसमस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी दोघांनीही सुट्टी घेऊन एका सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या कुटुंबासोबत खूप वेळ घालवत आहे. ती दररोज आपल्या मुलीसोबत क्युट आणि मजेदार फोटो शेअर करत असते. आता तिने तिच्या ट्रिपमधील काही फोटो पोस्ट केले आहे, ज्यामध्ये ती तिचा पती निक जोनास आणि मालती यांच्यासोबत दिसत आहे. यातील पहिल्या फोटोमध्ये प्रियांका आणी निक एकत्र दिसत आहेत. यात प्रियांका मिरर सेल्फी घेत आहे. तर, निक जोनास त्याच्या फोनमध्ये व्यस्त आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘माझा पती माझ्या मिरर सेल्फीमध्ये जरा जास्तच उत्सुक आहे..’ तिचं हे गंमतीदार कॅप्शन वाचून सगळ्यांनाच हसू आलं आहे.

यानंतर प्रियांका चोप्राने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती तिची मुलगी मालतीला घेऊन ख्रिसमस डेकोरेशन बघताना दिसत आहे. ही फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या ख्रिसमस सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. मालती मेरीचा पहिला नाताळ खास बनवण्यासाठी प्रियांका आणि निक दोघेही खास प्लॅन्स करत आहेत.

IPL_Entry_Point