मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सावनीचा डाव मुक्ता-सागरने लावला उडवून, सई सांगणार का न्यायाधीशांना सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळे वळण

सावनीचा डाव मुक्ता-सागरने लावला उडवून, सई सांगणार का न्यायाधीशांना सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 23, 2024 12:48 PM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. सावनीने सईची कस्टडीसाठी आखलेला डाव लावला मुक्ता-सागरने लावला उडवून. आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घ्या

सावनीचा डाव मुक्ताने-सागरने लावला उडवून, सई सांगणार का न्यायाधीशांना सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळे वळण
सावनीचा डाव मुक्ताने-सागरने लावला उडवून, सई सांगणार का न्यायाधीशांना सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत वेगळे वळण

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत कार्तिक या खलनायकाची एण्ट्री झाल्यापासूनच सगळ्या काही वेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहे. कोळी कुटुंबीयांनी मुक्ताला घराबाहेर काढले आहे. पण सागरला मुक्तावर पूर्ण विश्वास आहे की ती असे काही करणार नाही. या सगळ्यात मुक्ताला निर्दोषी ठरवण्यासाठी सागर पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतो. या सगळ्या संधीचा फायदा घेऊन सईची कस्टडी मिळावी म्हणून सावनी डाव आखते. मुक्ता आणि सागर ते डाव उडवून लावतात.

ट्रेंडिंग न्यूज

सागरवर चिडली इंद्रा

सईला झोपेतून उठवल्यावर सागर मुक्ताकडे सोडून येतो. ते पाहून इंद्रा आणि स्वातीला राग येतो. दोघीही सागरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करतात. सागर दोघींची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. पण काही फरक पडत नाही. त्या दोघीही चिडचिड करतात.
वाचा: मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकर याला पाठिंबा, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

सागरने केला आरतीला फोन

मुक्ता निर्दोषी आहे हे सिद्ध करण्यासाठी सागर पुरावे गोळा करत असतो. तो आरतीचा फोननंबर मुक्ताच्या क्लिनिकमधून शोधून काढतो आणि तिला फोन करतो. पण आरती फोन उचलून सागर आहे हे कळताच फोन ठेवून देते. त्यामुळे सागरचा संशय वाढतो. तो आरतीशी भेटून बोलण्याचा प्रयत्न करते.
वाचा: अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत

फॅमिली कोर्टाचे न्यायाधीश सागरच्या घरी

मुक्ताला तिची आई माधवी घरी घेऊन गेली असल्याचे कळताच सावनी एक डाव आखते. ती कौटुंबित कोर्टातील न्यायाधिशांना घडलेला प्रकार सांगते आणि घरी बोलवते. मुक्ता कोळी कुटुंबासोबत राहत नसल्यामुळे ती सईची कस्टडी मागते. पण जेव्हा न्यायाधीश येतात तेव्हा मुक्ता तेथे येते. ते पाहून सागरला धक्का बसतो. सगळेजण या नाटकात सहभागी होतात. सावनी हे सगळं खोटं असल्याचे सांगते. शेवटी न्यायाधीश हे मुक्ताचे आई-वडील माधवी आणि पुरुषोत्तम यांना बोलवताना दिसतात. माधवी आणि पुरुषोत्तम सगळं काही उत्तम सुरु असल्याचे सांगतात. यावरही सावनी शांत बसत नाही. ते सईला विचारा असे म्हणते. पण आता सई काय उत्तर देणार? ती मुक्ता घरात राहात नसल्याचे सांगणार की सगळ्यांचा नाटकात सहभागी होणार? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
वाचा: रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये 'ही' अभिनेत्री करणार काम

IPL_Entry_Point