मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prashant Damle: क्षण अभिमानाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशांत दामलेंचा सन्मान! पाहा व्हिडीओ..

Prashant Damle: क्षण अभिमानाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशांत दामलेंचा सन्मान! पाहा व्हिडीओ..

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 24, 2023 11:27 AM IST

Sangeet Natak Akademi Awards: नुकतेच अकादमी पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात करण्यात आला.

Prashant Damle
Prashant Damle

Sangeet Natak Akademi Awards: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच अकादमी पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी रंगभूमीवरचे अभिनय सम्राट अशी ओळख मिळवणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात करण्यात आला. या खास क्षणाचा व्हिडीओ अभिनेत्री कविता मेढेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर सध्या चाहते कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यंदाच्या यादीत मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बर कलाकारांनी स्थान मिळवलं आहे. यंदा २०१९ ते २०२१ अशा तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेते प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेत्री-लेखिका मीना नाईक आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना ‘संगीत नाटक अकादमी’च्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अभिनेते प्रशांत दामले पुरस्कार स्वीकारतानाचा खास व्हिडीओ कविता मेढेकर यांनी शेअर केला आहे.

‘आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. खूप खूप शुभेच्छा प्रशांत’, असं कॅप्शन देत कविता मेढेकर यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहे. चाहत्यांनी प्रशांत दामले यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. ‘हार्दिक अभिनंदन प्रशांत सर.... महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे’, असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर, ‘अभिनंदन प्रशांत दामले प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे’, असे एकाने म्हटले आहे.

संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी संगीत नाटक अकादमी दरवर्षी या पुरस्कारांची घोषणा करते. तर, राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते.

 

IPL_Entry_Point