मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Netflix : आनंदाची बातमी! नेटफ्लिक्स झालं आणखी स्वस्त! पहा काय आहेत नवे दर...

Netflix : आनंदाची बातमी! नेटफ्लिक्स झालं आणखी स्वस्त! पहा काय आहेत नवे दर...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 24, 2023 10:53 AM IST

Netflix recharge new rates : नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने त्यांचे सबस्क्रिप्शन दर आणखी कमी केले आहेत.

Netflix
Netflix

Netflix recharge new rates : लॉकडाऊनमुळे अवघं मनोरंजन विश्व आता ओटीटीच्या दिशेने वळताना दिसत आहे. एक दोन नव्हे, तर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यातीलचा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स. जगभरात पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून नेटफ्लिक्स प्रसिद्ध आहे. तर, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील कंटेंटमुळे करोडो लोक या ओटीटी प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने त्यांचे सबस्क्रिप्शन दर आणखी कमी केले आहेत.

काहीच महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सने भारतातील सबस्क्रिप्शन दर कमी केले होते. तर, आता नेटफ्लिक्सचे नवे दर भारतात नव्हे, तर मध्य पूर्व देशांमध्ये स्वस्त झाले आहेत. या भागात कंपनीला त्यांचे युजर्स वाढवायचे आहेत. यासाठी त्यांनी आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये जवळपास ४०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. नेटफ्लिक्सकडून सध्या अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत. नेटफ्लिक्सचे हे नवे प्लॅन्स वेगवेगळ्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह ऑफर केले जात आहेत.

नेटफ्लिक्सने येमेन, इराक, ट्युनिशिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन, लिबिया, अल्जेरिया, लेबनॉन, इराक, सुदान यांसारख्या मध्य पूर्व देशांमध्ये नेटफ्लिक्स प्लॅन स्वस्त केले आहेत. या देशांमध्ये, नेटफ्लिक्सचा मूळ प्लॅन ७.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६६१ रुपयांना होता., ज्याची किंमत आता ३ डॉलर म्हणजेच २४८ रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल ४०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर, प्रीमियम प्लॅनमध्ये देखील दर कमी झाले आहेत. प्रीमियम प्लॅन ११.९९ डॉलरवरून ९.९९ डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे.

इजिप्तमध्ये देखील नेटफ्लिक्सचे दर कमी करण्यात आले आहेत. नेटफ्लिक्स इजिप्तचे सबस्क्रिप्शन १०० इजिप्शियन पौंडऐवजी ५० इजिप्शियन पौंडमध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे, मोरोक्को आणि आखाती देशांमध्ये म्हणजेच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये देखील नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे दर कमी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन दर कमी झाल्याने आता नव्या युजर्सची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग