मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush : ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचा नवा विक्रम; अवघ्या २४ तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 12, 2023 10:19 AM IST

Adipurush Trailer Views: प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंह स्टारर चित्रपटाच्या ट्रेलरने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Adipurush
Adipurush

Adipurush Trailer Views: नुकताच 'आदिपुरुष' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अनेक वादांत अडकला आहे. मात्र, या परिस्थितीतही प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान आणि सनी सिंह स्टारर चित्रपटाने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच त्याने धुमाकूळ घातला आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा हा ट्रेलर २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेला आहे. रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळालेला हा पहिला हिंदी ट्रेलर ठरला आहे. ऑक्टोबर २०२२मध्ये, चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटाच्या पोस्टरमुळे विवादांना सामोरे जावे लागले होते. चित्रपटाच्या व्हीएफएक्सपासून ते चित्रपटात दाखवलेल्या स्टारच्या लूकपर्यंत लोकांकडून सगळ्याच गोष्टींवर बरीच टीका झाली होती. मात्र, इतक्या वादानंतरही निर्मात्यांनी हार मानली नाही.

Twinkle Khanna: राजेश खन्नाच्या लेकीला विकावे लागले होते मासे; ट्विंकल खन्नाने केला पहिल्या नोकरीचा खुलासा

मात्र, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटातील कलाकारांच्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. विशेषतः सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत काही बदल करण्यात आले आहेत. पोस्टर रिलीजनंतर या चित्रपटासंदर्भात अनेक वाद उफाळून आले होते. काही ठिकाणी तर लोकांनी प्रभासचा पुतळा जाळण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहून 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, जेणेकरून त्यांना गोष्टी दुरुस्त करण्यासाठी आणखी काही वेळ मिळाला होता. काही बदलांनंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून चाहत्यांची मने जिंकली.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर निर्मात्यांची मेहनत फळाला आल्याचे दिसत आहे. २४ तासांच्या आत हा ट्रेलर आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी ट्रेलर बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरने २४ तासांत ५२ दशलक्ष व्ह्यूज गाठले. तो सर्वाधिक पाहिला जाणारा हिंदी चित्रपट ट्रेलर बनला आहे.

IPL_Entry_Point

विभाग