मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आमचे जीवन सकारात्मकतेने उजळवले...' राजू यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

'आमचे जीवन सकारात्मकतेने उजळवले...' राजू यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Sep 21, 2022 01:47 PM IST

Comedian Raju Srivastava passes away: राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल सिनेजगतापासून राजकारणापर्यंतच्या सर्व सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

अनेकांनी वाहिली श्रद्धांजली
अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

राजू श्रीवास्तव यांनी प्रदीर्घ लढ्यानंतर आज या जगाचा निरोप घेतला. गेल्या ४२ दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या राजूला आज सकाळी १०.१५ वाजता मृत घोषित करण्यात आले. राजूच्या निधनाच्या बातमीने चित्रपट आणि टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे. राजू आता या जगात नाही यावर कोणालाच विश्वास बसणे कठीण आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवणारा आज सर्वांच्या डोळ्यात अश्रू देऊन गेले. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल सिनेजगतापासून राजकारणापर्यंतच्या सर्व सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी पासून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ते यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शोक व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांनी आमचे जीवन हास्य, विनोद आणि सकारात्मकतेने प्रकाशित केले. ते आपल्याला लवकर सोडून गेले पण आपल्या कार्यामुळे असंख्य लोकांच्या हृदयात ते जिवंत राहतील.

राजूसोबत दीर्घकाळ काम करत असलेला किकू शारदा म्हणतो की, अविश्वसनीय!! देशासाठी खूप मोठी हानी, एक अतिशय उत्तम कलाकार... राजू भाऊ तुमची आठवण येईल..

अनेक नेते, राजकारणी यांनी वाहिली श्रद्धांजली

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

IPL_Entry_Point

विभाग