मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pinkicha Vijay Aso: पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य, मालिका रोमांचक वळणावर

Pinkicha Vijay Aso: पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य, मालिका रोमांचक वळणावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 16, 2023 01:23 PM IST

Pinkicha Vijay Aso serial update: सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे आता ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत दिसणार आहे.

Pinkicha Vijay Aso
Pinkicha Vijay Aso

स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता मालिका रोमांचक वळणावर आहे. गजराजने पिंकीचा खून केल्यानंतर पिंकीने जगाचा निरोप घेतला की काय असं वाटत असतानाचा आता मालिकेत पुन्हा एकदा पिंकीची नव्या रुपात एण्ट्री होणार आहे. गजराज विरुद्ध पिंकीच्या या लढ्यात पुन्हा एकहा विजय पिंकीचाच होणार आहे. पिंकीला हे नवं रुप दिलंय प्लास्टिक सर्जन देवयानी सदावर्ते यांनी.

ट्रेंडिंग न्यूज

निसर्ग निर्मित प्रत्येक गोष्ट ही सुंदरच असते यावर देवयानी यांचा विश्वास आहे. अतिशय सकारात्मक आणि कोणत्याही वाईट गोष्टीत चांगलं शोधण्याची वृत्ती असणाऱ्या डॉ. देवयानी सदावर्ते पिंकीला तिच्या अपघातातून सावरतात आणि नवं जीवन आणि नवा चेहरा देतात. पिंकीच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात होतेय असंच म्हणायला हवं.
वाचा: ‘सुभेदार’च्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, चिन्मय मांडलेकरने सांगितले कारण

सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे- विज डॉ. शुभांगी सदावर्ते ही भूमिका साकारत असून जवळपास ६ वर्षांनंतर त्या मराठी मालिकेतून भेटीला येणार आहेत. या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या स्टार प्रवाह या नंबर वन वाहिनीसोबत काम करताना अतिशय आनंद होत आहे. कोठारे व्हिजन्सची ही मालिका आहे त्यामुळे महेश कोठारे यांनी या भूमिकेसाठी विचारणा केली तेव्हा हे पात्र मला खूपच आवडलं आणि मी तातडीने होकार दिला. पिंकीचा विजय असो या मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. डॉ. शुभांगी सदावर्ते पिंकीला नवा चेहरा देतात. मला खात्री आहे मालिकेतलं आणि पिंकीच्या आयुष्यातलं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

IPL_Entry_Point

विभाग