मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी गोडसे’ चित्रपटाविरुद्ध मुंबईत आंदोलन; प्रमोशन दरम्यानच सुरू झाला गदारोळ

Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी गोडसे’ चित्रपटाविरुद्ध मुंबईत आंदोलन; प्रमोशन दरम्यानच सुरू झाला गदारोळ

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 21, 2023 10:50 AM IST

Gandhi Godse Ek Yudh: सध्या ‘गांधी गोडसे’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. मात्र, प्रमोशनच्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काही लोकांनी गदारोळ माजवला.

Gandhi Godse
Gandhi Godse

Gandhi Godse Ek Yudh: दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्या आधीच या चित्रपटाला मोठा विरोध सुरू झाला आहे. मुंबईत या चित्रपटाविरोधात आंदोलन करण्यात आलं.

ट्रेंडिंग न्यूज

या आधी चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेने दिला होता. त्यानंतर आता या चित्रपटाविरोधात लोकांनी मुंबईमध्ये आंदोलन केलंय. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार संतोषी यांनी केली आहे. तर, मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात ‘नथुराम गोडसे’ साकारत आहे.

सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अशावेळी चित्रपटाचे प्रमोशन सुरू असताना या कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवत आणि जोरदार घोषणाबाजी करत काही लोकांनी गदारोळ माजवला. या ठिकाणी इतका गदारोळ मजला की, निर्मात्यांना पोलिसांना पाचारण करावं लागलं. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट महात्मा गांधींना कमी लेखून, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करतो, असे आंदोलकांनी म्हटले होते.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विरोधाभासी विचारसरणीचे चित्रण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्मात्यांनी या विषयावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाला एआर रहमान संगीत देणार असून. ‘संतोषी प्रॉडक्शन’च्या मनिला संतोषी निर्मित, हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गांधी-गोडसे एका युद्ध’ या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे तब्बल ९ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग