मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची घोषणा; तब्बल नऊ वर्षांनंतर ‘या’ दिग्दर्शकाचं होणार पुनरागमन!

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची घोषणा; तब्बल नऊ वर्षांनंतर ‘या’ दिग्दर्शकाचं होणार पुनरागमन!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 16, 2022 12:36 PM IST

Rajkumar Santoshi announces Gandhi Godse film: दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Gandhi Godse
Gandhi Godse

Rajkumar Santoshi announces Gandhi Godse film: ‘घातक’, ‘घायल’, ‘अंदाज अपना अपना’ अशा दमदार चित्रपटांनी बॉलिवूड गाजवणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा राजकुमार संतोषी एक वेगळा विषय हाताळताना दिसणार आहेत. या नव्या चित्रपटाची घोषणा करताना त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातून चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विरोधाभासी विचारसरणीचे चित्रण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्मात्यांनी या विषयावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाला एआर रहमान संगीत देणार असून. ‘संतोषी प्रॉडक्शन’च्या मनिला संतोषी निर्मित, हा चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आता केवळ या चित्रपटाचे एक टीझर पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. मात्र, चित्रपटासंबंधी इतर कोणतीही माहिती अजून सांगण्यात आलेली नाही. या चित्रपटात कोण कोणते कलाकार झळकणार हे देखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, या टीझर पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. आता या चित्रपटाशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक झाले आहेत. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असून, यातून कलाकारांबद्दल सांगण्यात येणार आहे.

‘गांधी-गोडसे एका युद्ध’ या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे तब्बल ९ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहेत. २०१३मध्ये रिलीज झालेला ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता पुन्हा एकदा एक नाव विषय घेऊन राजकुमार संतोषी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

WhatsApp channel

विभाग