मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhurav: राजभवनात रंगणार ‘मधुरव’चा प्रयोग; अभिनेत्री मधुरा वेलणकर करणार सादरीकरण

Madhurav: राजभवनात रंगणार ‘मधुरव’चा प्रयोग; अभिनेत्री मधुरा वेलणकर करणार सादरीकरण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 21, 2023 09:32 AM IST

Madhurav: मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन, नृत्य, नाट्य, अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे ‘मधुरव - बोरू ते ब्लॉग’.

Madhurav
Madhurav

Madhurav: अभिनेत्री मधुरा वेलणकरने लिहिलेलं 'मधुरव' हे पुस्तक त्यानंतर ऑनलाईन केलेल्या ‘मधुरव‘ या कार्यक्रमाला ‘कोविड योद्धा‘ हा पुरस्कार राज्यपालांकडून मिळाला. आता त्यानंतर ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’ हा रंगभूमीवरचा कार्यक्रम सादर होत आहे. नावात साधर्म्य असलं तरी हे तीनही कार्यक्रम वेगवेगळे आहेत. मधुरा वेलणकर साटमने ३ डिसेंबरला २०२२ला रंगभूमीवर 'मधुरव - बोरू ते ब्लॉग' हा कार्यक्रम सुरु केला आणि अल्पावधीतच या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांकडून पसंतीची पावती मिळवली. आता हा कार्यक्रम मंगळवार २४ जानेवारीला राजभवन, मुंबई येथे मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन, नृत्य, नाट्य, अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे ‘मधुरव - बोरू ते ब्लॉग’. आपण मराठी म्हणून जन्माला आलो पण आपली मराठी भाषा कशी जन्माला आली माहित आहे? मराठी भाषेत आपली ओळख दडली आहे. आपल्या मातृभाषेविषयी गोडी निर्माण व्हायला हवी, आपल्या भाषेविषयी अभिमान असायला हवा! आपल्या भाषेचे कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार? हे असे प्रश्न मधुरव या नाटकाच्या जाहिरातीतून पत्ररुपात विचारलेले आपण अनेक दिवस पाहत आहोत.

आपली मातृभाषा कशी जन्माला आली, आणि कशी वाढली, कशी लढली, कशी आपल्यापर्यंत पोहोचली, कशी श्रीमंत झाली हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्या भाषेचा रंजक आणि अद्वितीय असा इतिहास संगीतमय पद्धतीने मनोरंजनातून सांगितलेला हा आगळावेगळा अनुभव आहे जो प्रत्येक मराठी माणसाने घेतलाच पाहिजे.

‘मधुरव - बोरू ते ब्लॉग’ या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकरने साकारली आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, वेशभूषा श्वेता बापट, अंकिता जठार, नेपथ्य प्रदीप पाटील,पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, शीर्षकगीत संगीत हृषिकेश रानडे, पार्श्वगायन हृषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे रसिकांच्या भेटीला आले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग