मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘भाईजान’ला मिळणार ‘पठाण’ची साथ! शाहरुखच्या चित्रपटासोबत रिलीज होणार सलमानच्या चित्रपटाचा टीझर!

Pathaan: ‘भाईजान’ला मिळणार ‘पठाण’ची साथ! शाहरुखच्या चित्रपटासोबत रिलीज होणार सलमानच्या चित्रपटाचा टीझर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 21, 2023 09:09 AM IST

Pathaan Movie: शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये सलमान खान देखील ‘टायगर’च्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख आणि सलमानला मोठ्या पडद्यावर अॅक्शन अवतारात पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.

Salman-Shah rukh khan
Salman-Shah rukh khan

Pathaan Movie: ‘पठाण’च्या रिलीजसाठी केवळ शाहरुख खानचे चाहतेच नाही, तर सलमान खानचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये सलमान खान देखील ‘टायगर’च्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख आणि सलमानला मोठ्या पडद्यावर अॅक्शन अवतारात पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. दरम्यान, सलमान खानचा दुसरा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' च्या टीझरबाबत देखील एक अपडेट समोर आली आहे. ‘पठाण’मध्ये सलमान खानच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे.

यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये बॉलिवूडच्या करण-अर्जुनला अर्थात शाहरुख आणि सलमानला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या ‘पठाण’सोबत रिलीज होणार आहे. हा टीझर १.४५ मिनिटांचा असेल, असे बोलले जात आहे. ‘किसी का भाई, किसी की जान’ हा चित्रपट खास ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशराज फिल्म्सनेही स्पाय युनिव्हर्स बनवण्याची तयारी केली आहे. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात सलमान खान 'टायगर'च्या भूमिकेत दिसणार आहे, तर सलमान आणि कतरिनाच्या 'टायगर ३'मध्ये शाहरुख खान देखील कॅमिओ करणार आहे. इतकंच नाही, तर याशिवाय शाहरुख आणि सलमान खान हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्येही दिसणार आहेत. यशराज संपूर्ण स्पाय युनिव्हर्स तयार करत आहेत, ज्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

चार वर्षांनंतर आपल्या आवडत्या अभिनेत्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते या चित्रपटाचे आगाऊ बुकिंगही करत आहेत. परदेशात ‘पठाण’ चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून, २० जानेवारीपासून भारतातही सुरू होणार आहे. 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला भारतासह जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.

WhatsApp channel