मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’चं खास फॅमिली स्क्रीनिंग; शाहरुख खान-गौरीसह मुलांचीही हजेरी! पाहा Video

Pathaan: ‘पठाण’चं खास फॅमिली स्क्रीनिंग; शाहरुख खान-गौरीसह मुलांचीही हजेरी! पाहा Video

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 17, 2023 12:12 PM IST

Pathaan Movie Screening for family: शाहरुख खानने त्याच्या कुटुंबासह ‘पठाण’ चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचा आनंद घेतला.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Pathaan Movie Screening for family: बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज व्हायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची संपूर्ण तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान, शाहरुख खानने त्याच्या कुटुंबासह ‘पठाण’ चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचा आनंद घेतला. ‘पठाण’चं हे खास स्क्रीनिंग फक्त त्याच्या कुटुंबासाठी ठेवण्यात आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

या दरम्यान, शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी गौरी खान आणि मुले सुहाना खान आणि आर्यन खानसोबत स्क्रीनिंगनंतर बाहेर येताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यशराज स्टुडिओमध्ये खान कुटुंबासाठी खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाहरुख खानश, गौरी, सुहाना आणि आर्यन यांच्यासोबतच शाहरुख खानची बहीण शहनाज खान आणि गौरीची आई सविता छिब्बर देखील उपस्थित होत्या.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ‘पठाण’चा अॅक्शन धमाका पाहून शाहरुख आणि त्याचे कुटुंब खूप आनंदी दिसत होते. यावेळी शाहरुख खान आणि आर्यन खानने स्क्रिनिंगसाठी पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. तर, सुहाना ग्रे ट्रॅकसूटमध्ये दिसली होती. खान कुटुंब यावेळी अतिशय आनंदात दिसत होते.

चित्रपट रिलीजच्या उंबरठ्यावर असताना दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रीप्शन यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. दृष्टिहीन लोकांना देखील OTT प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा आनंद घेता यावा, यासाठी हे बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदल केल्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीएफसीला पुन्हा प्रमाणपत्र घेण्यास देखील सांगितले आहे.

IPL_Entry_Point