मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pankaj Kapur Birthday: इंजिनिअरिंगमध्ये केलं टॉप अन् १६ वर्षांच्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ! वाचा पंकज कपूरबद्दल...

Pankaj Kapur Birthday: इंजिनिअरिंगमध्ये केलं टॉप अन् १६ वर्षांच्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ! वाचा पंकज कपूरबद्दल...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 29, 2023 12:25 PM IST

Happy Birthday Pankaj Kapur: अभ्यासात टॉपर असणाऱ्या पंकज कपूर यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असल्यापासूनच ते नाटकात भाग घेत असत.

Pankaj Kapur
Pankaj Kapur

Happy Birthday Pankaj Kapur: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर आज त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंकज कपूर त्यांनी पडद्यावर साकारले वेगवेगळ्या पात्रांसाठी खूप प्रसिद्ध आहे. केवळ व्यावसायिक आयुष्यच नव्हे तर, पंकज कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. पंकज कपूर यांचा जन्म २९ मी १९५४ रोजी लुधियाना येथे झाला. अभ्यासात टॉपर असणाऱ्या पंकज कपूर यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असल्यापासूनच ते नाटकात भाग घेत असत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे अर्थात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. १९७३मध्ये पंकज यांनी इंजिनिअरिंगच्या परीक्षेत टॉप केले. यानंतर त्यांना चांगली नोकरीही मिळाली होती.

मात्र, एवढं सगळं यश मिळवल्यानंतरही पंकज कपूर यांची अभिनयाची गोडी कमी झाली नाही. यानंतरही ते अभिनय सोडण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत. नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी आपले नाटकांतील काम चालूच ठेवले आणि ते एक उत्तम अभिनेता बनले. चित्रपटांमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी पंकज यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही नशीब आजमावले होते. त्यांनी ‘नीम का पेड’, ‘करमचंद’, ‘ऑफिस ऑफिस’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. खूप मेहनत केल्यानंतर त्यांना ‘जाने भी दो यारों’, ‘मकबूल’, ‘हल्ला बोल’, ‘रोजा’, ‘मंडी’, ‘गांधी’ आणि ‘दस’ यांसारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

Sona Mohapatra: कमल हासनवर टीका करणाऱ्या चिन्मयी श्रीपादला मिळाला सोना मोहपात्राचा पाठिंबा! म्हणाली...

पंकज कपूर थिएटर करत असतानाच त्यांची भेट अभिनेत्री नीलिमा अझीम यांच्याशी झाली झाली. अवघ्या १६ वर्षांच्या असलेल्या नीलिमा नृत्यात निपुण होत्या. पंकज आणि नीलिमा थिएटर करत असतानाच एकमेकांचे चांगले मित्र बनले. त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि त्यानंतर १९७५मध्ये दोघांनी लग्न केले. त्यावेळी पंकज २१ वर्षांचे होते आणि नीलिमा अवघ्या १६ वर्षांच्या होत्या. लग्नाच्या काही वर्षांनी त्यांच्या घरी शाहिद कपूरचा जन्म झाला. पण, यानंतर नीलिमा आणि पंकज यांच्यातील नाते मात्र बिघडू लागले. त्यानंतर त्यांच्या नात्यात काहीच चांगले झाले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. ९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.

यानंतर, ‘मौसम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पंकज कपूर यांची भेट अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्याशी झाली. सुप्रिया देखील घटस्फोटित होती. काही काळानंतर पंकज आणि सुप्रिया यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. घटस्फोटानंतर चार वर्षांनी पंकजने सुप्रियाशी लग्न केले.

IPL_Entry_Point

विभाग