मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sona Mohapatra: कमल हासनवर टीका करणाऱ्या चिन्मयी श्रीपादला मिळाला सोना मोहपात्राचा पाठिंबा! म्हणाली...

Sona Mohapatra: कमल हासनवर टीका करणाऱ्या चिन्मयी श्रीपादला मिळाला सोना मोहपात्राचा पाठिंबा! म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 29, 2023 11:41 AM IST

Sona Mohapatra Supports Chinmayi Sripaada: अभिनेते कमल हासन यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. पण, नेमके त्याचवेळी कमल हासन यांना दाक्षिणात्य गायिका चिन्मयी श्रीपाद हिने घेरले.

Sona Mohapatra Supports Chinmayi Sripaada
Sona Mohapatra Supports Chinmayi Sripaada

Sona Mohapatra Supports Chinmayi Sripaada: ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू गेल्या एक महिन्यापासून दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. ते भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघ ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे. अलीकडेच या कुस्तीपटूंना साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हासनचाही पाठिंबा मिळाला. अभिनेत्याने कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. पण, नेमके त्याचवेळी कमल हासन यांना दाक्षिणात्य गायिका चिन्मयी श्रीपाद हिने घेरले. ‘जेव्हा मीटू दरम्यान इंडस्ट्रीतील या सगळ्या गोष्टी उघड झाल्या, तेव्हा तुम्ही कुठे होतात?’, असा प्रश्न तिने केला आहे. आता चिन्मयी श्रीपादला गायिका सोना मोहपात्राची साथ मिळाली आहे.

चिन्मयी श्रीपादचे ट्विट शेअर करत सोना मोहपात्रा हिने लिहिले की, 'प्रिय चिन्मयी, तुला खूप प्रेम आणि शक्ती मिळो. तू नेहमीच आपली बेधडक प्रतिक्रिया देण्यास पुढे आलीस. आज आणि नेहमी, तू अशीच मजबूत राहा. तुला डावलण्याचा प्रयत्न करणारे सगळे मतीमंद लोक नरकात जावोत!’

गायिका चिन्मयी श्रीपादाने कमल हासनच्या कुस्तीपटूंना पाठिंबा देणाऱ्या वक्तव्यावर ट्विट केले होते. ती म्हणाली होती की, 'नक्कीच माझे हे ट्वीट वाचून कमल हासनचे सर्व चाहते आणि फॉलोअर्स मला त्रास देण्यास आणि बलात्काराची धमकी देण्यास तयार झाले असतील. पण, खंबीर महिलांना अनेकदा अशा प्रकारे डावलण्याचा प्रयत्न केला जातो.

ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कमल हासनने ट्विटरवर लिहिले की, 'कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू होऊन एक महिना उलटून आहे. राष्ट्राभिमानासाठी लढणाऱ्यांना आज स्वतःच्या सुरक्षेसाठी लढावे लागत आहे.’ यावेळी त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि म्हटले होते की, ‘असा कलंकित व्यक्ती राष्ट्रीयस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचे प्रतिनिधित्व कसे करू शकतो?’ यावर आता अनेक वादविवाद होताना दिसत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग