मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arjit Singh Video: पायात चप्पल, हातात पिशवी घेऊन बाजारात सामान आणायला निघाला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक! व्हिडीओ व्हायरल
Arijit Singh
Arijit Singh

Arjit Singh Video: पायात चप्पल, हातात पिशवी घेऊन बाजारात सामान आणायला निघाला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक! व्हिडीओ व्हायरल

25 May 2023, 11:19 ISTHarshada Bhirvandekar

Arjit Singh Viral Video: बॉलिवूड स्टार्सचा सिंपल लूक आणि स्टाईल क्वचितच पाहायला मिळते. पण, सोशल मीडियावर दिसलेल्या अरिजित सिंहच्या लूकने लोकांची मने जिंकली आहेत.

Arjit Singh Viral Video: बॉलिवूडचित्रपटांमध्ये अनेक उत्कृष्ट गाणी गाऊन चाहत्यांची मने जिंकणारा गायक अरिजित सिंहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंह पायात चप्पल आणि हातात बॅग घेऊन कोलकात्याच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. अरिजितचा हा लूक आणि साधेपणा पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षावही करत आहेत. अरिजित सिंहचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूड स्टार्सचा सिंपल लूक आणि स्टाईल क्वचितच पाहायला मिळते. पण, सोशल मीडियावर दिसलेल्या अरिजित सिंहच्या लूकने लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये अरिजित सिंह पायात चप्पल, हातात बॅग घेऊन आणि साध्या कपड्यांमध्ये स्कूटी चालवत बाजारात जाताना दिसत आहे. अरिजित सिंहचा हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील त्याच्या मूळ गावचा अर्थात मुर्शिदाबादचा आहे. या व्हिडीओमध्ये तो इतक्या साध्या लूकमध्ये दिसत आहे की, त्याला एका नजरेत ओळखणे तुम्हाला कठीण जाईल.

अरिजित सिंहचा हा लूक पाहून चाहत्यांना त्याच्या साधेपणाची खात्री पटली आहे. आयुष नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साधेपणासोबतच अरिजित सगळ्यांशी गप्पा मारत जातानाचाअरिजितचा हाव्हिडीओ व्हायरल झाला होता. काही या व्हिडीओमध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याने त्याचा हात धरून त्याला खेचले, ज्यामध्ये तो जखमी झाला होता. या कॉन्सर्ट दरम्यान अरिजित चाहत्याला या कृत्याचा खुलासा करताना दिसत आहे. यानंतर अरिजितने आयपीएल स्टेजवर महेंद्रसिंह धोनीच्या पायाला हात लावतानाचा व्हिडीओही खूप चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये त्याच्या दिलदारपणाचे खूप कौतुक झाले.

विभाग