मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautela: पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहने उर्वशीला इन्स्टाग्रामवर केले फॉलो, पण काळी वेळातच...

Urvashi Rautela: पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहने उर्वशीला इन्स्टाग्रामवर केले फॉलो, पण काळी वेळातच...

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 13, 2022 01:03 PM IST

Naseem Shah and Urvashi Rautela: पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत.

उर्वशी रौतेला
उर्वशी रौतेला (HT)

पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा आशिया कप पाहण्यासाठी उर्वशी दुबईला गेल्यामुळे सुरु झाल्या. तसेच स्टेडियममधील त्या दोघांची नजरानजर झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा पासून त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. आता नसीम उर्वीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या सोशल मीडियावर नसीमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्स लिस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये नसीम उर्वशीला फॉलो करत असल्याचे दिसत आहे. पण काही वेळातच नसीमने उर्वशीला अनफॉलो केले आहे. हे स्क्रीनशॉट शेअर करत नेटकऱ्यांनी दोघांवरही निशाणा साधला आहे.
आणखी वाचा: उर्वशीने शेअर केला पाकिस्तीनी क्रिकेटपटूसोबतचा रोमँटिक व्हिडीओ, झाली ट्रोल

नसीमला एका मुलाखतीमध्ये उर्वशीला डेट करत आहेस का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने थेट कोण उर्वशी, मी ओळखत नाही असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला.

नेमकं काय आहे प्रकरण?

उर्वशीने ४ सप्टेंबर रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ भारत आणि पाकिस्तान सामन्यामधील होता. व्हिडीओमध्ये नसीम क्रिकेटच्या मैदानात हसत होता आणि उर्वशी त्याच्याकडे पाहात होता. हा व्हिडीओ उर्वशीच्या एका फॅनपेजने तयार केला होता. यापूर्वी उर्वशीचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले गेले होते.

IPL_Entry_Point

विभाग