मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naatu Naatu: यंदा ऑस्करमध्ये दिसणार ‘नाटू नाटू’ची धूम; RRRच्या गाण्याचा सोशल मीडियावरही ट्रेंड!

Naatu Naatu: यंदा ऑस्करमध्ये दिसणार ‘नाटू नाटू’ची धूम; RRRच्या गाण्याचा सोशल मीडियावरही ट्रेंड!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 01, 2023 10:31 AM IST

RRR Naatu Naatu Song: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची धूम पाहायला मिळणार आहे.

RRR
RRR

RRR Naatu Naatu Song: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची धूम पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कार २०२३मध्ये नामांकन मिळाले आहे. आता या गाण्याला नामांकन मिळाल्यामुळे चाहते देखील उत्साहात आहेत. चाहत्यांची हीच उत्सुकता आणखी वाढण्याचे मोठे कारण म्हणजे या वर्षी होणाऱ्या ऑस्करच्या मंचावर ‘नाटू नाटू’ या गाण्यावर नृत्य देखील सादर होणार आहे. राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव हे या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. ‘आरआरआर’चे आयकॉनिक गाणे ऑस्करच्या मंचावर सादर होणारे हे ऐकून चाहत्यांचा आनंद दुणावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

येत्या १२ मार्चला रात्री सुरू होणाऱ्या ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये हे मानाचे पुरस्कार जाहीर होणार आहेत. याच सोहळ्यात ‘नाटू नाटू’ या गाण्यावर होणारे सादरीकरण अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा ऑस्कर पुरस्कारांवर खिळल्या आहेत. जगभरातून पाहिल्या जाणाऱ्या याच मानाच्या सोहळ्यात यंदा ‘नाटू नाटू’ची धूम पाहायला मिळणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून ‘आरआरआर’चे चाहते जल्लोष करत आहेत. इतकेच नाही तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील याच गाण्याची चर्चा सुरू असून, ‘नाटू नाटू’ ट्रेंड होत आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातील सगळ्याच प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. तर, ऑस्कर २०२३मध्ये या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला नामांकन मिळाले असून, हे गाणे यंदा ऑस्कर पुरस्कार घेऊन येईलच अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहेत.

ट्विटरवर देखील ‘नाटू नाटू’चा जल्लोष पाहायला मिळत आहे. ट्विटरवर ‘नाटू नाटू’च्या लाईव्ह परफॉर्मन्सबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘आरआरआरच्या नाटू नाटू या गाण्याने संपूर्ण जगाला एक केलं आहे’, असे चाहते म्हणत आहेत. तर, संपूर्ण जगातील चाहते या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. नुकतेच कोरियन एम्बेसीमधील विद्यार्थ्यांनी देखील या गाण्यावर डान्स करत हटके ट्रिब्युट दिला आहे.

IPL_Entry_Point

विभाग