मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sarla Ek Koti: तुझी लक्ष्मी सरलाला लाव डावावर; 'सरला एक कोटी'चा टीझर चर्चेत

Sarla Ek Koti: तुझी लक्ष्मी सरलाला लाव डावावर; 'सरला एक कोटी'चा टीझर चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 19, 2022 03:58 PM IST

Sarla Ek Koti Teaser: टीझरमधील इशा केसकरचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळतेय.

सरला एक कोटी
सरला एक कोटी (HT)

काही दिवसांपूर्वी 'सरला एक कोटी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. पण घोषणा झाल्यानंतर चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला. नावावरून हा चित्रपट काय असेल, कसा असेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. या चित्रपटात ओंकार भोजने आणि ईशा केसकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार हे ऐकून सर्वांचीच उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'सरला एक कोटी' चित्रपटाच्या १ मिनिटे २७ सेकंदाच्या टीझरमध्ये पत्त्यांचा गॅम्बलर असलेला भिका (ओंकार भोजने) आणि सौंदर्याची खाण असलेली सरला (ईशा केसकर) यांचं नवीनच लग्न झालेले दाखवले. आपल्या सासूसोबत (छाया कदम) आणि नवऱ्यासोबत राहणाऱ्या सरलावर गावातल्या लोकांची वाईट नजर आहे. अशात गरीब घरातला आणि पत्त्यांचा नाद असलेला भिका थेट बायकोलाच म्हणजे, सरलाला पत्त्याच्या डावावर लावणार का? असा प्रश्न टीझरमधून लोकांना पडतो.
वाचा: 'मुलं हिंदू होतील की मुस्लिम?; ट्रोलर्सच्या प्रश्नावर देवोलीनाने दिले उत्तर

चित्रपटाच्या टीझरमध्ये कलाकारांची मोठी फौज दिसतेय. कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, अभिजीत चव्हाण, विजय निकम, यशपाल सरताप हे कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. तसेच ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करेल याचा अंदाज येतोय. आणखी एक बाब म्हणजे टीझरमधले संवाद आणि पार्श्वसंगीत हे अत्यंत आकर्षित करणारे आहेत. त्यामुळे ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट ‘पॉवर पॅक्ड’ असा चित्रपट असेल असे टीझरवरून वाटत आहे.

“सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग