मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gadkari Trailer: जहाँ चाह वहाँ वजह है; ‘गडकरी’चा ट्रेलर प्रदर्शित

Gadkari Trailer: जहाँ चाह वहाँ वजह है; ‘गडकरी’चा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 16, 2023 11:06 PM IST

Gadkari movie: अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित 'गडकरी' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Nitin Gadkari Biopic
Nitin Gadkari Biopic

सध्या बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बायोपिकचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित देखील सिनेमा येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'गडकरी' असे आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शिक झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'गडकरी' चित्रपटाच्या २ मिनिटे ३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’चा प्रवास दिसत आहे. नितीन गडकरी यांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या या कारकिर्दीतील चढ उतार ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यांचे राजकीय आणि खासगी आयुष्य या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या ‘गडकरी’ यांचा असामान्य प्रवास २७ ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.
वाचा: बिग बॉस १७चे घर आतुन पाहिलेत का?

'गडकरी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली.

‘गडकरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली असून या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग भुसारी यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

IPL_Entry_Point