अंतराची अंगठी सापडणार; लीला आणि अभिरामचा साखरपुडा होणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्वीस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अंतराची अंगठी सापडणार; लीला आणि अभिरामचा साखरपुडा होणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्वीस्ट

अंतराची अंगठी सापडणार; लीला आणि अभिरामचा साखरपुडा होणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्वीस्ट

Apr 23, 2024 05:40 PM IST

लीला आणि अभिराम यांची जोडी तुटू नये, म्हणून आजी देवघरात जाऊन देवापुढे प्रार्थना करत होती. देवाची प्रार्थना करत असताना तिच्या ओंजळीत देवाच्या हारात अडकलेली अंगठी पडली.

अंतराची अंगठी सापडणार; लीला आणि अभिरामचा साखरपुडा होणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्वीस्ट
अंतराची अंगठी सापडणार; लीला आणि अभिरामचा साखरपुडा होणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्वीस्ट

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत आज अभिराम आणि लीला यांचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. अंतराची अंगठी हरवल्याने अभिराम तिच्यावर चिडला होता. तर, तो साखरपुड्यातून माघार घेत तिथून निघून जाणार आहे. त्यानंतर लीलाच्या कुटुंबाचा मोठा अपमान होणार आहे. अभिरामच्या तिन्ही सुना मिळून लीलाच्या कुटुंबावर आता मोठे आरोप करणार आहेत. लक्ष्मी, सरस्वती, आणि दुर्गा यांनी अंतराआईची अंगठी लीला आणि तिच्या कुटुंबांना विकून खाल्ली, असं म्हणत तिच्या संपूर्ण कुटुंबाला सगळ्यांसमोर अपमानित करण्याचा प्रयत्न केला. हा अपमान सहन न झाल्याने लीला तिथून निघून गेली. या अपमानामुळे लीला इतकी संतापली की, तिला तिचा राग आवरताच येत नव्हता.

यामुळे लीलाला चक्कर येऊ लागली आणि ती तोल जाऊन पाण्यात पडणार इतक्यात अभिरामने तिला सावरलं. मात्र, लीलाने अभिरामवरच हल्लाबोल केला. ‘तुम्हाला माहित होतं, मी तुमच्या तोलामोलाची नाही. मी तुमच्या घरात येण्याच्या लायकीची नाही. मी तुमच्या घराला सांभाळू शकत नाही. जी मुलगी एक अंगठी सांभाळू शकली नाही, ती एवढं मोठं साम्राज्य कसं काय हाताळेल? याचा जरा तरी विचार करा. सगळे म्हणतात की, लीलाला काहीच येत नाही. लीला चुकाच करत असते. मात्र, लग्नासाठी माझी निवड करून तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली आहे. मला तुमच्याशी लग्न करायचंच नव्हतं. तुम्ही रेवतीची मदत केली, म्हणून दिलेलं वचन पाळण्यासाठया लग्नाला तयार झाले, नाही तर मला तुमच्याशी लग्न करण्याची काहीही इच्छा नाही’, असं लीला म्हणते.

स्कुटी राईड अन् हातांचा स्पर्श! सायली अर्जुन जाणार डेटवर; ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये प्रेम फुलणार

आजीला सापडणार हरवलेली अंगठी

लीलाची बडबड ऐकून संतापलेला अभिराम तिला गप्प राहण्यास सांगतो. ‘तू अंतराची अंगठी हरवून माझा जीवच हरवलायस. माझे निर्णय कदाचित चुकू शकतात. मात्र, माझ्या अंतराचे निर्णय कसे काय चुकतील?’, असा सवाल अभिराम करत असतानाच आता मागून आजी येऊन अभिरामच्या हातात अंतराची अंगठी ठेवणार आहे. अंतराची खरी अंगठी नेमकी कुठे आणि कशी मिळाली? हे जाणून घेण्याची उत्सुकता अभिरामला देखील आहे. लीला आणि अभिराम यांची जोडी तुटू नये, म्हणून आजी देवघरात जाऊन देवा पुढे प्रार्थना करत होती. देवाची प्रार्थना करत असताना तिच्या ओंजळीत देवाच्या हारात अडकलेली अंगठी पडली. अभिराम आणि लीलाचं लग्न हे देवाने ठरवलंय, असं म्हणत आजीने अंगठी अभिरामला दाखवली आणि त्याला साखरपुड्यासाठी तयार केलं.

साळुंके घालणार गोंधळ!

दुसरीकडे, ही अंगठी आता मिळाली असून, हा साखरपुडा होणार असल्याची घोषणा करत आजी अभिराम आणि लीला यांना आतमध्ये घेऊन आली. आता अंतराची अंगठी मिळाल्यामुळे लीला आणि अभिराम यांचा साखरपुडा पार पडणार आहे. मात्र, त्यात एक मोठं विघ्न आड येणार आहे. हे विघ्न म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून, साळुंके आहे. अभिरांच्या घरातील डेकोरेशन आणि इतर गोष्टींचे व्यवस्थापन साळुंकेची कंपनी सांभाळत आहे. यामुळे साळुंखेदेखील अभिरामच्या घरात आलेला आहे. आता साळुंके लीला आणि अभिराम यांचा साखरपुडा होताना बघणार आहे. हे बघून चावताळलेला साळुंके मोठा तमाशा घालणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner