मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nagraj Manjule: 'सैराट'नंतर नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर पुन्हा एकत्र, दिसणार ‘या’ चित्रपटात

Nagraj Manjule: 'सैराट'नंतर नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर पुन्हा एकत्र, दिसणार ‘या’ चित्रपटात

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 25, 2022 05:15 PM IST

Akash Thosar: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आकाश ठोसर
आकाश ठोसर (HT)

काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटली तरी प्रेक्षक ते आवडीने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे २०१६ साली प्रदर्शित झालेला 'सैराट.' चित्रपटातील अर्ची आणि परश्याच्या जोडीने तर प्रेक्षकांची मने जिंकली. आर्चीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरु यांनी साकारली होती आणि परश्याची भूमिका आकाश ठोसर यांनी साकारली होती, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता लवकरत नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नागराज मंजुळे यांचा 'घर, बंदुक, बिरयाणी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २०२१मध्ये या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला होता. आता नवा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

'घर, बंदुक, बिरयाणी' या चित्रपटाच्या १ मिनिटे २१ सेकंदाच्या टीझरमध्ये नागराज मंजुळे आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहेत. तर सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसत आहेत. टीझरमध्ये संवाद नसले तरी आर्मी ऑफिसर आणि दहशतवादी यांच्यामधील चकमक पाहायला मिळते. दरम्यान, सयाजी शिंदे यांच्या कॉमडेची छोटी झलक पाहायला मिळते.

IPL_Entry_Point

विभाग