मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naga Chaitanya Birthday: घटस्फोटानंतरही नेहमीच चर्चेत राहिली समंथा अन् नागा चैतन्यची लव्हस्टोरी!

Naga Chaitanya Birthday: घटस्फोटानंतरही नेहमीच चर्चेत राहिली समंथा अन् नागा चैतन्यची लव्हस्टोरी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 23, 2022 10:28 AM IST

Naga Chaitanya Birthday: दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा मुलगा नागा चैतन्य स्वतः देखील एक उत्कृष्ट अभिनेता आहे.

Naga Samantha
Naga Samantha

Naga Chaitanya Birthday: साऊथ मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेता नागा चैतन्य याचा आज (२३ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचा मुलगा नागा चैतन्य स्वतः देखील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. नागा चैतन्य याचा जन्म २३ नोव्हेंबर १९८६ रोजी चेन्नईमध्ये झाला. नागा चैतन्य हा नागार्जुन आणि लक्ष्मी दग्गुबती यांचा मुलगा. मात्र, नागाच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. नुकताच अभिनेता नागा चैतन्य याने देखील पत्नी समंथा प्रभू हिला घटस्फोट दिल्याने तो चर्चेत आला होता.

ट्रेंडिंग न्यूज

अवघ्या मनोरंजन विश्वात नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या लव्हस्टोरीची चर्चा झाली होती. दोघांच्या लग्नसोहळ्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. या डोळे दिपवणाऱ्या सोहळ्याची चर्चा अनेक दिवस सुरु होती. या शाही लग्नसोहळ्यानंतर तब्बल ४० दिवसांसाठी समंथा आणि नागा हनिमूनसाठी गेले होते. याची ही खूप चर्चा झाली होती.

नागा आणि समंथा यांची प्रेमकथा देखील मनोरंजन विश्वात प्रचंड चर्चेत आली होती. २००९मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्य यांची भेट झाली होती. ‘या माया चेसावे’ या चित्रपटात नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्या दरम्यान दोघेही वेगवगेळ्या व्यक्तींना डेट करत होते. या काळात नागा चैतन्य अभिनेत्री श्रुती हसन हिला डेट करत होता, तर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही अभिनेता सिद्धार्थ याला डेट करत होती. मात्र, दोघांनी देखील याला अधिकृत दुजोरा दिला नव्हता. मात्र, या चित्रपटा दरम्यान नागा आणि समंथा एकमेकांच्या प्रेमात पडले. या चित्रपटानंतर दोघे ‘सूर्या’ या चित्रपटात देखील एकत्र झळकले.

या चित्रपटानंतर दोघांच्या प्रेमाला आणखी बहर आला. ‘सूर्या’ चित्रपटानंतर नागा चैतन्य आणि समंथा दोघेही एका व्हेकेशन ब्रेकसाठी एकत्र गेले होते. याचवेळी नागाने समंथाला प्रपोज केलं होतं. दोघांच्या प्रपोजलचे व्हिडीओ आणि फोटो देखील प्रचंड व्हायरल होते. अखेर २०१७मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, २०२१मध्ये दोघांनी घटस्फोट घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. घटस्फोटानंतरही त्यांची लव्हस्टोरी मात्र नेहमीच चर्चेत राहिली.

IPL_Entry_Point