मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mitali Mayekar: अंघोळ करतानाच्या फोटोमुळे मिताली मयेकर झाली ट्रोल, आता उचलले मोठे पाऊल

Mitali Mayekar: अंघोळ करतानाच्या फोटोमुळे मिताली मयेकर झाली ट्रोल, आता उचलले मोठे पाऊल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 28, 2023 01:37 PM IST

Mitali Mayekar: मितालीने अंघोळ करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता तिने हे पाऊल उचलले आहे.

मिताली मयेकर
मिताली मयेकर (HT)

कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारत असतात. तसेच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी माहिती देत असतात. सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती अंघोळ करताना दिसत आहे. या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर मितालीने मोठा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मितालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंघोळ करतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केले. त्यानंतर काही वेळातच मितालीने कमेंट सेक्शनच बंद केले. जेणेकरुन फोटोंवर कोणीही कमेंट करणार नाही.
वाचा: राज ठाकरे लिहिणार लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक

मिताली सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील बांधवगड येथे गेली आहे. तिने तेथील जंगल सफारीदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. हे जंगल व्याघ्र सफारीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जगभरातील वाघांचे दर्शन होते, असे म्हटले जाते.

मितालीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने वयाच्या १३ व्या इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग