मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sangharshayoddha: 'सैराट'मधील हा अभिनेता साकारणार मनोज जरांगेंवरील 'संघर्षयोद्धा' सिनेमात भूमिका

Sangharshayoddha: 'सैराट'मधील हा अभिनेता साकारणार मनोज जरांगेंवरील 'संघर्षयोद्धा' सिनेमात भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 24, 2024 05:45 PM IST

Manoj Jarange Patil Biopic: संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील या चित्रपटात 'सैराट'मधील अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

Manoj Jarange Patil Biopic
Manoj Jarange Patil Biopic

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत. त्यांनी अनेक ठिकणी उपोशण केले. महाराष्ट्रातील लाखो लोक त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव 'संघर्षयोद्धा' असे आहे. आता या चित्रपटात कोणता अभिनेता दिसणार हे समोर आले आहे.

संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहे. अशताच आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हा अभिनेता या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. आता हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती आली समोर, वाचा

'सैराट' या चित्रपटातील सलीम शेख म्हणजेच सल्या या नावाने ओळखला जाणारा अभिनेता अरबाज शेख 'संघर्षयोद्धा' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अरबाजने संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने "राज्यभर चर्चेत असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मी महत्वाची भूमिका बजावत असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्यभूमिका बजावत असणारे रोहन पाटीलयांच्या सोबतचा हा शूटलोकेशनचा फोटो" असे कॅप्शन दिले आहे.

'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झाले आहे. या खास प्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका असणार आहेत.

WhatsApp channel