बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खानला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना सैफला दुखापत झाली. त्यानंतर थेट मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात होते. आता सैफच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
सैफच्या गुडघ्याची आणि हाताची शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंत्तेचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकजण तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत होते. आता सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: ‘मी अयोध्येला पुन्हा येणार’; सुपरस्टार रजनीकांत बेहद्द खुष
सैफ अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सैफ अली खानच्यासोबत त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान ही देखील दिसत आहे. सैफ अली खानच्या खांद्याला फॅक्चर असल्यामुळे प्लास्टर केल्याचे दिसत आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ घरी परतला आहे. घरी आल्यावर त्याने फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली.
'दैनिक भास्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खानच्या गुडधा आणि खांद्याला फ्रॅक्चर आहे. खान कुटुंबीयांना सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी माहिती दिलेली नाही. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'देवारा'चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो 'भहिरा' ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर काही झाले की काय? असा अंदाज वर्तवला जात होता. आता सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.