मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manoj Jarange Patil Biopic: 'हा' अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील, चित्रीकरणास सुरुवात

Manoj Jarange Patil Biopic: 'हा' अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील, चित्रीकरणास सुरुवात

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 20, 2024 09:03 AM IST

Manoj Jarange Patil Biopic: मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्षमय प्रवास आता मोठ्या पडद्यावर देखील पाहायला मिळणार आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil Biopic: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यातील हा प्रवास आता मोठ्या पडद्यावर देखील पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, 'संघर्षयोद्धा' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकताच सुरु झाले आहे. पण कोणता अभिनेता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळीच ओळख आहे. इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखले जायचे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी "एक मराठा, लाख मराठा" म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील... आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांनमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे , त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचे चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.
वाचा: श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील फोटो व्हायरल

'संघर्षयोद्धा' या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहेत. तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे . या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे चित्रीकरण सुरु आहे.

IPL_Entry_Point