मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shweta Tiwari Photos: श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील फोटो व्हायरल

Shweta Tiwari Photos: श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील फोटो व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 19, 2024 06:59 PM IST

Shweta Tiwari Viral Photo: अभिनेत्री श्वेता तिवारीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. आता हा मुलगा कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Shweta Tiwari
Shweta Tiwari

Shweta Tiwari Post: अभिनेत्री श्वेता तिवारी हे टीव्ही विश्वातील अतिशय प्रसिद्ध नाव आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकणाऱ्या श्वेता तिवारीला खासगी आयुष्यात खूप स्ट्रगल करावे लागले होते. तिचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. आता सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती कोणासोबत दिसत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

श्वेता तिवारी ही ४३ वर्षांची झाली आहे. या वयातही तिचे सौंदर्य आणि फिटनेस एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असे आहे. सध्या श्वेता तिवारी ही व्हेकेशन मोडवर असून गोव्यात आहे. या दरम्यान तिने एका तरुणासोबत तिने फोटो पोस्ट केला आहे. आता या फोटोवरून चर्चांना उधाण आले असून हा तरुण कोण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
वाचा: मी लक्षाच्या एका शब्दावर...; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीत वर्षा उसगावकर भावूक

श्वेताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर गोव्यातील सुट्ट्यांचा आनंद घेतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील एका फोटोत ती मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. सोबतच पाण्यात भिजलेला एक तरुण देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने सूर्यास्ताचा उल्लेख केला आहे.

श्वेताने हा फोटो शेअर करताचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने 'संतूर वाली मम्मी' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'हे आई आणि मुलगा कोणत्या अँगलने दिसत आहेत?' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या यूजरने 'तुझा जावई आहे का?' असा सवाल विचारला आहे. मात्र, श्वेताने कोणालाही उत्तर दिलेले नाही.

श्वेता तिवारीसोबतचा तरुण कोण?

श्वेता तिवारीने गोव्यातील हा फोटो शेअर करत सोबत हॅशटॅगही दिले आहेत. यामध्ये #Goa2.0 आणि #motherandson हे हॅशटॅग दिले आहेत. हा फोटो शेअर करत तिने हा तरुण तिचा मुलगा असल्याचे म्हटले आहे. फोटोत श्वेता तिवारीसोबत असणाऱ्या तरुणाचे नाव वरुण कस्तुरिया असे आहे. अर्थात वरूण हा रिअल नव्हे तर स्मॉल स्क्रिनवरील अभिनेता आहे. या दोघांनी एका मालिकेत आई आणि मुलाची भूमिका साकारली होती. 'काव्या-एक जज्बा एक जुनून' असे या मालिकेचे नाव होते. वरुणने एका मुलाखतीत श्वेताचे कौतुकही केले होते. शोमध्ये त्यांच्यात इतके चांगले नाते निर्माण झाले की वरुण ऑफ-स्क्रीनवरही श्वेताला आई म्हणूनच आवाज देतो.

WhatsApp channel

विभाग