Malaika Arora Viral Video: बॉलिवूडची ‘छैय्या छैय्या’ गर्ल अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी मलायका नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. मात्र, नुकताच अभिनेत्रीवर एक विचित्र प्रसंग ओढवला होता. मलायका अरोरा हिने प्रसिद्ध निर्माता रितेश सिधवानी आणि त्याची पत्नी यांच्यासोबत एका पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी पार्टीतून बाहेर पडत असताना, रितेश सिधवानी याने पत्नीचा हात समजून चुकून मलायकाचा हात पकडला. मात्र, आपली चूक लक्षात येताच त्याने मलायकाचा हात सोडला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मलायका अरोरा आणि रितेश सिधवानी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. विरल भयानी याने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिघेही एकत्र पार्टीतून बाहेर पडत असल्याचे दिसत आहेत. यावेळी रितेश त्याच्या फोनवर बोलत बाहेर येताना दिसला. फोनवर व्यस्त असल्याने त्याने चुकून पत्नीचा हात न धरता मलायका अरोराचा हात पकडला. यावेळी मलायकाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
या व्हायरल व्हिडीओवर युजर्सकडूनही वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘अरेरे चुकून चूक झाली वाटतं..’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘मित्रा देवाचे आभार मान की, त्यावेळी अर्जुन इथे नव्हता.’ अर्थात ही गोष्ट रितेशकडून चुकून घडली असली, तरी समोर गराडा घालून उभ्या असलेल्या पापाराझींच्या कॅमेरातून हा क्षण काही सुटला नाही. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र, यावेळी गोंधळून न जाता मलायका आणि रितेश यांनी ही स्थिती सांभाळून घेतली.
अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत नीता अंबानीच्या शाही इव्हेंटमध्ये दिसली होती. या कार्यक्रमात दोघेही खूप सुंदर दिसत होते. मलायका आणि अर्जुन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. सोशल मीडियावर देखील ते एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
संबंधित बातम्या