Jeev Majha Guntala latest update: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हारच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. या मालिकेच्या कथानकात देखील आता अनेक नवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. अंतरा आणि मल्हारच्या आयुष्यातून आताच एक संकट कमी होऊन, सुखाची चाहूल लागली होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात एक नवं संकट दत्त म्हणून उभं ठाकणार आहे.
अंतरा आणि मल्हारच्या आयुष्यात आता आनंदाची बातमी आली आहे. अंतरा गर्भवती असून, लवकरच आई होणार आहे. मात्र, अंतरा आणि मल्हारचं हेच सुख तिच्या बहिणीला अर्थात श्वेताला बघवत नाहीये. अंतराला त्रास व्हावा आणि तिच्या पोटातील बाळाला संपवता यावं यासाठी ती वेगवेगळे डाव आखत आहे. कधी अंतराला स्टुलावरून खाली पडण्याचा प्रयत्न तर, कधी जमिनीवर तेल टाकून तिला पडण्याचा प्रयत्न असे सगळं काही ती करत आहे. मात्र, प्रत्येक वेळी अंतरा यातून सुखरूप बाहेर पडत आहे.
आता श्वेता अंतराला संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. श्वेता बहिणीवर म्हणजेच अंतरावर आणि तिच्या पोटातील बळावर जीवघेणा हल्ला घडवून आणणार आहे. मात्र, यावेळी देखील कथेत एक ट्वीस्ट येणार आहे. कधीकाळी श्वेताशी हातमिळवणी करून अंतरा आणि मल्हारच्या जीवावर उठलेली चित्रा आता मदतीसाठी धावून येणार आहे. अंतरावर जीवघेणा हल्ला होत असताना अचानक चित्रा तिथे येऊन तिला गुंडांच्या तावडीतून सोडवते. त्यामुळे आता चित्रा खरंच बदलली आहे की, हा देखील तिचा एक डाव असावा असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
मात्र, चित्राच्या येण्यामुळे अंतरा आणि तिच्या बाळाचा जीव वाचला आहे. अंतराच्या मागे लागले गुंड आता चित्राचा पाठलाग करणार आहेत. तर, हे खेळी देखील फोल ठरल्याने श्वेता आता चिडून नवीन डाव रचणार आहे. अंतरा आणि मल्हारच्या सुखी संसाराच्या वाटेत आता आणखी नवी संकटं येणार असून, याला दोघेही एकत्रपणे सामोरे जाणार आहेत.
संबंधित बातम्या