मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtra Shahir: शाहीर साबळेंच्या आईला पाहिलंत का? ‘महाराष्ट्र शाहीर’मधील आणखी एक चेहरा आला समोर!

Maharashtra Shahir: शाहीर साबळेंच्या आईला पाहिलंत का? ‘महाराष्ट्र शाहीर’मधील आणखी एक चेहरा आला समोर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 06, 2023 08:12 AM IST

Maharashtra Shahir Movie Update: गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या चित्रपटातून अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारली जाणार आहेत.

Maharashtra Shahir Movie
Maharashtra Shahir Movie

Maharashtra Shahir Movie Latest Update: शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधरित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची फौज मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. सध्या निर्माते आ चित्रपटातील प्रत्येक पात्र पोस्टरच्या माध्यमातून रिव्हील करत आहेत. आता या चित्रपटातील एका अतिशय महत्त्वाचे पात्र प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील शाहीर साबळे यांच्या आईच्या भूमिकेचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या भूमिकेत अभिनेत्री शुभांगी सदावर्ते झळकणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या चित्रपटातून अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारली जाणार आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अभिनेत्री शुभांगी सदावर्ते ही शाहीर साबळे यांच्या आईची म्हणजेच लक्ष्मीबाई गणपतराव साबळे यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नाटक आणि मालिका विश्व गाजवणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचा हा पहिलावहिला चित्रपट आहे.

‘संगीत देवबाभळी’ या नाटकात ‘आवली’ या पात्रातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या शुभांगी सदावर्ते हिने ‘लक्ष्य’ या मालिकेत देखील महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. नुकतच ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘जाऊ नको किस्ना’ हे गाण प्रदर्शित झालं. या गाण्यात अभिनेत्री शुभांगी सदावर्तेची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. आता शुभांगीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. या नव्या चित्रपटासाठी चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. साने गुरुजी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण ही त्यांपैकीच काही नावे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग