मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: लावणी स्टार गौतमी पाटीलचा पुण्यातील कार्यक्रम रद्द, काय आहे कारण?

Gautami Patil: लावणी स्टार गौतमी पाटीलचा पुण्यातील कार्यक्रम रद्द, काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 11, 2023 09:49 AM IST

Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावर स्वत:चे मत मांडले आहे.

गौतमी पाटील
गौतमी पाटील (HT)

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील सतत चर्चेत असते. तिच्या लावणीवर अनेकजण फिदा आहेत. १० फेब्रुवारी रोजी गौतमीचा पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी ऐन वेळी पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यामागे काय कारण आहे? असा प्रश्न पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील शिवणे येथे गौतमीचा कार्यक्रम होती. शिवणे येथील धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटीलच्या हस्ते होणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाला तुफान गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ज्या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम होणार होता त्या जागेची NOC आणि ट्रॅफिक NOC नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही.
वाचा: प्रेमाचे रंग उलघडणारा 'जग्गू आणि ज्युलिएट'

महाराष्ट्रात अनेक राजकीय लोक गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. जेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गौतमीला बोलवण्याचा प्रकार अजित पवार यांच्या कानी पडला तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला. याविषयी मत मांडताना अजित पवार म्हणाले की, 'लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण लावण्यांच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात लावण्यांना बंदी आहे. याची सविस्तर माहिती मी घेणार आहे. आपली परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन.'

IPL_Entry_Point

विभाग