मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Winner: बिग बॉस १६चा विजेता पुण्याचा एमसी स्टॅन नक्की आहे तरी कोण?

Bigg Boss Winner: बिग बॉस १६चा विजेता पुण्याचा एमसी स्टॅन नक्की आहे तरी कोण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 13, 2023 08:34 AM IST

Mc Stan: बिग बॉस १६च्या स्ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या एमसी स्टॅन विषयी जाणून घ्या काही खास गोष्टी…

एमसी स्टॅन
एमसी स्टॅन (HT)

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १६चा विजेता कोण ठरणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. काल, १२ फेब्रुवारी रोजी अखेर बिग बॉसची ग्रँड फिनाले पार पडली. त्यावेळी टॉप तीन स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, प्रियांका चौधरी आणि एमसी स्टॅन यांनी स्थान पटकावले होते. शेवटी एमसी स्टॅनने बिग बॉस १६च्या स्टॉफीवर कोरले स्वत:चे नाव. पण हा एमसी स्टॅन आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एमसी स्टॅन हा एक रॅपर आहे. त्याचे खरे नाव अल्ताफ शेख असे आहे. तो केवळ २३ वर्षांचा आहे. पुण्यातील ताडीवाला रोड येथे एमसी स्टॅन लहानाचा मोठा झाला आहे. सातवी इयत्तेत असताना त्याने रॅपर व्हायचे ठरवले. मोठ्या भावाच्या माध्यमातून स्टॅनला संगीताची गोडी लागली. सायबर कॅफेत बसून रॅप संस्कृतीबद्दल स्टॅनने वाचले होते.
वाचा: 'बिग बॉस १६'च्या विजेत्याला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या

बिग बॉसच्या घरात स्टॅन अतिशय शांत होता. सुरुवातीच्या आठवड्यात तर त्याने कोणाशीही मैत्री केली नव्हती. तो एकटा दिसायचा. त्याचे आणि शिव ठाकरेचे भांडण झाले होते. मात्र नंतर हळूहळू त्याची शिव आणि अब्दू रोझिक साजीद खान, गोरी नागोरी यांच्याशी चांगली मैत्री झाली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बिग बॉसच्या घरात आयोजित कॉन्सर्टमध्ये स्टॅनने परफॉर्म केले आणि चाहत्यांची मने जिंकून घेतली होती.

IPL_Entry_Point

विभाग