मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अंकुशच्या 'महाराष्ट्र शाहीर' चं चित्रीकरण कुठे झालं? केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

अंकुशच्या 'महाराष्ट्र शाहीर' चं चित्रीकरण कुठे झालं? केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

Payal Shekhar Naik HT Marathi
Jul 01, 2022 02:48 PM IST

(maharashtra shahir- kedar shinde) केदार यांनी शाहिरांच्या भूमिकेसाठी अंकुशची निवड केल्यावर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र एक पोस्ट करत केदार यांनी चाहत्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं होतं.

महाराष्ट्र शाहीर
महाराष्ट्र शाहीर

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी लवकरच महाराष्ट्राचे लोकशाहीर शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तेव्हाचा काळ शाहिरांचं जीवन, त्यांच्या अडचणी सगळंच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटासाठी अंकुशच्या मेकअप पासून ते चित्रीकरणासाठी जागा शोधण्यापर्यत केदार शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तो काळ दाखवायचा म्हणजे जागाही तशीच हवी. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोणती जागा निवडण्यात अली होती ठाऊक आहे का? केदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये या जागेचा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केदार यांनी यासाठी साताऱ्याच्या डोंगरांची निवड केली होती. हा सुंदर प्रवास दाखवताना केदार यांनी लिहिलं, 'कुठल्याही सिनेमात पडद्यावर कलाकार जितका महत्वाचा रोल प्ले करतो तितकाच महत्वाचा भाग शुटिंगसाठी निवडण्यात येणाऱ्या लोकेशनचा असतो.. ते सुद्धा सिनेमाचं एक पात्रच असतं.. आणि त्यात ही महाराष्ट्र शाहीर सारखा पिरियड सिनेमा असेल तर लोकेशन निवडीचे निकष अधिकच कठीण होतात.. त्या काळातली स्थापत्य रचना.. रंगसंगती.. रस्त्यांची रचना.. घरांच्या बांधकामाची पद्धत.. अशा अनेक परीक्षा मधून जाऊन लोकेशन योग्य की अयोग्य हे ठरतं.. गेले तीन दिवस महाराष्ट्र शाहीर ची टीम ह्याच कामात व्यस्त होती.. सातारा आणि आसपासच्या भागातील अनेक सुंदर लोकेशन फिरून, निवडून, खूप भटकून, डोंगर दऱ्या चढून उतरून आम्ही जेव्हा हे तीन दिवस पूर्ण केले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं.. महाराष्ट्र शाहीर च्या घडणीतला हा एक महत्त्वाचा टप्पा.. अजून पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे.. काही प्रवास हे मुक्कामा इतकेच सुंदर असतात!!'

केदार यांनी शाहिरांच्या भूमिकेसाठी अंकुशची निवड केल्यावर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र एक पोस्ट करत केदार यांनी चाहत्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग