मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kapil Sharma : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘या’ सवयीमुळे पत्नी झालीये हैराण; अभिनेत्याने स्वतः केला खुलासा..

Kapil Sharma : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘या’ सवयीमुळे पत्नी झालीये हैराण; अभिनेत्याने स्वतः केला खुलासा..

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 20, 2023 11:01 AM IST

Kapil Sharma Talks about his wife Ginni: कपिल शर्मा याने आपल्या विनोदांनी नेहमीच सगळ्यांना खळखळवून हसवले आहे. मात्र, कपिल शर्मा याच्या एका सवयीमुळे त्याची पत्नी मात्र प्रचंड हैराण झाली आहे.

Kapil Sharma
Kapil Sharma

Kapil Sharma Talks about his wife Ginni: कॉमेडी किंग कपिल शर्मा याने आपल्या विनोदांनी नेहमीच सगळ्यांना खळखळवून हसवले आहे. मात्र, कपिल शर्मा याच्या एका सवयीमुळे त्याची पत्नी मात्र प्रचंड हैराण झाली आहे. याचा खुलासा स्वतः कपिल शर्मा याने केला आहे. याचा किस्सा सांगताना कपिल शर्मा म्हणाला की, तो जेव्हा 'द कपिल शर्मा शो'चे शूट संपवून घरी जातो, तेव्हा एकदम शांत बसतो आणि घरात कुणाशीही बोलत नाही. त्याच्या याच सवयीला पत्नी गिन्नी वैतागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकत्याच प्रसारित झालेल्या 'द कपिल शर्मा शो'च्या एपिसोडमध्ये न्यूज अँकर शनेता सिंह, अंजना ओम कश्यप आणि चित्रा त्रिपाठी यांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्माने त्यांना प्रश्न विचारला की, ‘स्टुडिओतून बाहेर आल्यानंतर कुणाशी बोलावे असे वाटते का?’ याला उत्तर देताना अंजना म्हणाली की, 'स्टुडिओतून बाहेर आल्यानंतर मी काही वेळ गप्प बसते आणि त्यावेळी मला कुणाशीच बोलायची इच्छा नसते.’ यावेळी कपिल शर्मा म्हणाला की, हीच गोष्ट माझ्या पत्नीला देखील समजावून सांगा.

कपिल म्हणाला की, शोच्या शूटिंगनंतर घरी गेलो की, मी शांत बसतो. कुणाशीही बोलत नाही. त्यावेळी गिन्नीला वाटतं की मी तिच्याशी बोलत नाही, तिला टाळतोय. नेहमीच तिची ही तक्रार असते. पण, आता तिला हे कसं समजावणार की, सतत बोलून आल्यावर आम्ही देखील कंटाळतो आणि आम्हाला देखील थोडावेळ शांत बसावं वाटतं. यावेळी अंजनाला देखील कपिलचं बोलणं पटलं आणि तिने या शोच्या माध्यमातून गिन्नीला विनंती केली. यानंतर कपिल शर्माने देखील भर शोमध्ये पत्नी गिन्नीची माफी मागितली. त्याचवेळी त्याने कुटुंबाला देखील वेळ देण्याचं वचन दिलं.

IPL_Entry_Point

विभाग