मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swara Bhasker Marriage: कंगनाने स्वराला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...

Swara Bhasker Marriage: कंगनाने स्वराला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2023 01:11 PM IST

Swara Bhasker Marriage: स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी एकमेकांशी लग्न केले. स्वरा भास्करने ट्विटरवर या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते.

Swara Bhasker Marriage
Swara Bhasker Marriage

Swara Bhasker Marriage: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने स्वरा भास्करला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराने सपा नेते फहाद झिरार अहमदसोबत मुंबईत कोर्ट मॅरेज केले. फहाद आणि स्वरा यांचे अभिनंदन करताना कंगना म्हणाली होती की, ‘लग्न ही मनातून होतात, बाकी सर्व काही फक्त औपचारिकता असते.’ कंगनाच्या या शुभेच्छांवर आता स्वरा भास्करची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. स्वराने देखील कंगनाचे आभार मानले आहेत. या ट्वीटवरून आता दोघींमध्ये दिलजमाई झाली असावी, असा अंदाज चाहते बांधत आहेत.

स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी एकमेकांशी लग्न केले. स्वरा भास्करने ट्विटरवर या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. या पोस्टवर कंगनाने स्वरा आणि फहादला शुभेच्छा देत लिहिले होते की, ‘तुम्ही दोघेही आनंदी दिसत आहात ही देवाची कृपा आहे...लग्नं ही मनातून होतात. बाकी सर्व काही फक्त औपचारिकता असते.’

यावर स्वरा भास्करने देखील आता कंगनाचे आभार मानत लिहिले की, ‘धन्यवाद कंगना... तुला देखील प्रत्येक सुख आणि आनंद मिळो.’ कंगना रनौत आणि स्वरा भास्कर या दोघीही त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. दोघींमध्ये अनेकदा ट्वीट वॉर दिसून आला आहे. मात्र, कंगनाने लग्नासाठी स्वराचे केलेले अभिनंदन आणि त्यानंतर स्वराने दिलेल्या उत्तरावरून आता दोघींमध्ये मैत्री होत आहे, असा कयास चाहते बांधत आहेत.

स्वरा भास्करने १७ फेब्रुवारीला संध्याकाळी एक पोस्ट टाकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. स्वरा आणि फहादने १६ फेब्रुवारीला मुंबईत स्पेशल मॅरेज कायद्यानुसार लग्नसोहळा उरकला आहे. पुढील महिन्यात ते नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. दिल्लीतील शाहिनबागमधील आंदोलनावेळी स्वरा आणि फहादची भेट झाली होती. त्यानंतर अनेक महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग