मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidharth-Kiara Wedding: ‘पंगा क्वीन’ कंगना रनौतची सिद्धार्थ-कियारासाठी खास पोस्ट; म्हणाली...

Sidharth-Kiara Wedding: ‘पंगा क्वीन’ कंगना रनौतची सिद्धार्थ-कियारासाठी खास पोस्ट; म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 04, 2023 12:34 PM IST

Sidharth-Kiara Wedding: अभिनेत्री कंगना रनौत हिने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sidharth-Kiara Wedding
Sidharth-Kiara Wedding

Sidharth-Kiara Wedding: बॉलिवूडची 'शेरशहा’ जोडी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी या जोडीला शुभेच्छा देत आहेत. यातच आता ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत हिने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिद्धार्थ कियाराचा एक फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. कंगनाची ही सोशल मीडिया स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेत्री कंगना रनौत हिने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थ-कियाराचा हा व्हिडीओ ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कंगना रनौतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही जोडी किती छान आहे... चित्रपटसृष्टीत खरे प्रेम क्वचितच पाहायला मिळते... दोघेही एकत्र खूप सुंदर दिसतात.' कंगनाची ही इन्स्टा स्टोरी सध्या व्हायरल झाली असून, चाहत्यांना ती खूप आवडत आहे.

Kangana's Post
Kangana's Post

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. या जोडप्याचे प्री-वेडिंग सोहळे ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहे. तर, ६ फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मेहेंदी, हळद आणि संगीता या सगळ्या कार्यक्रमांसाठी दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने शेरशाह या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली होती.

IPL_Entry_Point