मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत व मालदीवमधील संबंधात कटुता आली आहे. मोईज्जू सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने सोशल मिडियावर भारतीयांनी संताप व्यक्त केला. यानंतर बॉयकॉट मालदिव हा ट्रेंड देखील सुरू केला आहे. याचा गंभीर परिणाम मालदिवच्या पर्यटणावर होताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली. यामध्ये कंगना रणौतचा देखील सहभाग आहे.
अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपण वक्तव्य करताना दिसते. नुकताच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत वक्तव्य केले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मालदीवमधील काही लोक यावर ज्यापद्धतीने व्यक्त होत आहेत, ते चुकीचे आहे. सर्वप्रथम मोदींनी आपल्या देशाचाच प्रचार केलाय. फक्त लक्षद्वीसाठीच नाही. तर संपूर्ण देशासाठीचे ते काम करतात. ते सर्वांनाच सांगत आहेत की, भारतातच विवाह करा. ते भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे काही मालदीवमधील पर्यटन कमी होणार नाही."
वाचा: भारत-मालदीव वादावर अमिताभ बच्चन बोलले! म्हणाले, मी लक्षद्वीपला जाऊन आलोय, तिथं…
पुढे कंगना म्हणाली, "जर लोक काश्मीरला जात असतील. तर याचा अर्थ असा नाही की, मनालीतील पर्यटन कमी होईल. पीएम मोदी अधिकाधिक लोकांना प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. यामुळे दुसऱ्या देशांतील पर्यटन कमी होणार नाही. सध्याच्या युगात लोक प्रत्येक ठिकाणी जाऊ इच्छितात. मोदी भारतातील पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लक्षद्वीपला प्रमोट करत आहेत. याचा अर्थ मालदीव चांगले नाही , असा होत नाही."
अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान यांनी मादीवल वादावर प्रतिक्रिया दिली. सर्वांनी भारतातील पर्यटनाला पाठिंबा दिला. तसेच मालदीवच्या मंत्र्यांवर टीका केली.