पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना मालदीव सरकारने बडतर्फ केल्यानंतरही या टीकेचे पडसाद उमटत आहेत. या एका घटनेमुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्याही आता मालदीवच्या विरोधात उतरल्या आहेत. तसेच बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
मालदीवपेक्षा भारतातील लक्षद्वीप आणि अंदमान ही दोन्ही बेटे अतिशय सुंदर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या समुद्रकिनारी फिरतानाचे फोटो शेअर केल्यामुळे या चर्चा रंगल्या. त्यानंतर लगेच क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केलेले ट्वीट अमिताभ बच्चन यांनी रिट्वीट केले.
वाचा: एआर रहमान मुंबई ऐवजी चेन्नईमध्ये का राहतो? जाणून घ्या कारण
उडप्पीचा सुंदर समुद्रकिनारा, पाँडीचा पॅराडाइज समुद्र किनारा, अंदमानचे निळे आणि हॅवलॉक आपल्या देशातील सुंदर निसर्गरम्य स्थळे आहेत. आपल्या देशातील सुंदर समुद्र किनारे असे आहेत जिथे आजपर्यंत लोक गेले नाहीच आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या देशावर आणि आपल्या पंतप्रधानांवर केलेली टीका भारतासाठी पर्यटकांना आकर्षक बनवण्यासाठी व आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक उत्तम अवसर आहे. कृपया तुमच्या आवडत्या न शोधलेल्या सुंदर ठिकाणांना नाव द्या...
अमिताभ यांनी सेहवागचे ट्वीट रिट्वीट केले आहे. 'वीरु पाजी .. हे खूप समर्पक आहे. आपला देश हा सुंदर आहे. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे. तेथील ठिकाणे सर्वांना चकित करणारी आहेत.. सुंदर पाण्याचे समुद्रकिनारे आणि पाण्याखालील अनुभव अतिशय थरारक आहे' या आशयाचे ट्वीट बिग बींनी केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान यांनी मादीवल वादावर प्रतिक्रिया दिली. सर्वांनी भारतातील पर्यटनाला पाठिंबा दिला. तसेच मालदीवच्या मंत्र्यांवर टीका केली.
संबंधित बातम्या