मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'ऋषभ पंतशी लग्न करणार ?', उर्वशी रौतेलाने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण

'ऋषभ पंतशी लग्न करणार ?', उर्वशी रौतेलाने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 24, 2024 09:55 AM IST

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या नात्याच्या कायमच जोरदार चर्चा रंगलेल्या असतात. आता उर्वशीने ऋषभशी लग्न करणार का? या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'ऋषभ पंतशी लग्न करणार ?', उर्वशी रौतेलाने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण
'ऋषभ पंतशी लग्न करणार ?', उर्वशी रौतेलाने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण

भारतीय संघातील स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत कायमच चर्चेत राहिला आहे. कधी त्याच्या खेळामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. ऋषभ हा जवळपास १५ महिन्यांनंतर आयपीएलच्या निमित्ताने मैदानात उतरला आहे. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल २०२४च्या दुसऱ्या सामन्यातून क्रिकेटमध्ये पुनरागम केले आहे. ऋषभचा खेळ पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. दरम्यान, ऋषभ पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडले जात आहे. आता उर्वशीने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. दोघे सतत एकमेकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत होते. पण २०२२मध्ये ऋषभचा अपघात झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम लागला. त्यापूर्वी उर्वशी जवळपास प्रत्येक मुलाखतीमध्ये आरपीचे नाव घेत होती. आता ऋषभने पुनरागम केल्यानंतर त्यांच्या दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
वाचा: ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाला पाहिलेत का? डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल

नुकताच एका मुलाखतीमध्ये उर्वशीला ऋषभबाबत प्रश्न विचारण्याच आला होता. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने थेट उर्वशीच्या पोस्टवरील कमेंट वाचून दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याने एका चाहत्याची कमेंट हायलाइट केली. ‘ऋषभला तू कधीही विसरु नकोस. तो तुझा आदर करतो. पंत तुला कायम आनंदी ठेवेल… जर तुमचं लग्न झालं तर आम्हाला आनंद होईल…’ असे चाहता म्हणाला होता. त्यावर उर्वशीने दिलेल्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'नो कमेट… म्हणजे यावर मला काहीही बोलायचे नाही…’ असे उर्वशी म्हणाली.
वाचा: अनंत अंबानी ते अभिषेक बच्चन; ‘हा’ आहे सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट

असे पहिल्यांदाच झालेले नाही. यापूर्वी देखील ऋषभ पंत खेळत असताना उर्वशीला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच उर्वशीने प्रत्येक वेळी यावर बोलणे टाळले होते. यावेळी देखील तिने असेच केले आहे.

ऋषभने साधला होता उर्वशीवर निशाणा

ऋषभने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर उर्वशीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, 'प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी लोक मुलाखतीत खोटे बोलतात. वाईट केवळ याचे वाटते की काही लोक प्रसिद्धी आणि नावासाठी इतके भुकेले असतात. देव त्यांचे भले करो' असे म्हटले होते. पण नंतर ऋषभने ही पोस्ट डिलिट केली होती.

IPL_Entry_Point