Atul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Atul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये का?

Atul Kulkarni Birthday: दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अतुल कुलकर्णींबद्दल ‘हे’ माहितीये का?

Sep 10, 2023 08:24 AM IST

Happy Birthday Atul Kulkarni: अतुल कुलकर्णी यांनी केवळ मराठीच नव्हे तर , हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

Atul Kulkarni
Atul Kulkarni

Happy Birthday Atul Kulkarni: आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठी मनोरंजन विश्वचं नव्हे तर, हिंदीसह साऊथ इंडस्ट्री गाजवणारे अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा आज (१० सप्टेंबर) वाधीवास आहे. अतुल कुलकर्णी यांचा जन्म कर्नाटकात झाल होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण देखील कर्नाटकातून पूर्ण केले. लहानपणासून अभिनयाचं वे असणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी दहावीत असताना पहिल्यांदा त्यांच्या शाळेत अभिनय केला. यानंतर त्यांचा हा प्रवास जोरदार सुरू झाला. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत अतुल कुलकर्णी अनेक नाट्यगटांमध्ये सामील झाले. त्यांनी खूप मेहनतीने अभिनयाचे बारकावे शिकून घेतले होते.

अतुल कुलकर्णी यांनी केवळ मराठीच नव्हे तर , हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. या दरम्यान, त्यांनी १९९५मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा केला. त्यानंतर ते पूर्णपणे चित्रपटांकडे वळले. ‘भूमि गीता’ या चित्रपटातून अतुल कुलकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. यानंतर, अतुल कुलकर्णी यांनी प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.

Anurag Kashyap Birthday: अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेले ‘हे’ हटके बॉलिवूड चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

एकापेक्षा एक दमदार चित्रपट करत असतानाच, अतुल कुलकर्णी यांना मधुर भांडारकर ‘चांदनी बार’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने अतुल यांना प्रचंड यश मिळवून दिले. या चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी साकारलेले पात्र खूप प्रसिद्ध झाले होते. अभिनेत्री तब्बू हिने या चित्रपटात मुख्य नायिका होती. या चित्रपटाची कथा देखील तब्बूभोवती फिरणारीच होती. पण, तरीही अतुल कुलकर्णी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले.

‘चांदनी बार’ या चित्रपटाव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी यांनी ‘रंग दे बसंती’ आणि ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ मध्ये देखील दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटांमधून अतुल यांनी केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर ते समीक्षकांचे देखील आवडते बनले. यानंतर अतुल कुलकर्णी यांनी ‘नटरंग’ हा चित्रपट केला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. कुटुंब, मित्र आणि समाजाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड देत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची कथा या चित्रपटात दाखवली गेली आहे. लिंगभेदासारखे मुद्देही या चित्रपटात ठळकपणे मांडण्यात आले आहेत. मुख्य आणि सहाय्यक पात्राबरोबरच अतुल कुलकर्णी यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकाही खूप गाजल्या.

Whats_app_banner