मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: तेरा पता! गौतमी पाटीलचे नवे गाणे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Gautami Patil: तेरा पता! गौतमी पाटीलचे नवे गाणे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 23, 2023 04:26 PM IST

Gautami Patil New Album: जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार गौतमी पाटीलचा नवा अल्बम

गौतमी पाटील
गौतमी पाटील (HT)

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा तिच्या नव्या लावणीमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. तिच्या लावणीवर अनेकजण फिदा आहेत. आता गौतमी लवकरच एक अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गौतमी पाटीलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नवा अल्बम येत असल्याची माहिती दिली आहे. गौतमीच्या या नव्या अल्बमचे नाव तेरा पता असे आहे. हा अल्बम २४ फेब्रुवारी म्हणजेच उद्या प्रदर्शित होणार आहे. या गाण्याची सर्वजण आतुरने वाट पाहात आहे.
वाचा: सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत...; उर्फीचे ट्वीट व्हायरल

महाराष्ट्रात अनेक राजकीय लोक गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. जेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गौतमीला बोलवण्याचा प्रकार अजित पवार यांच्या कानी पडला तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला होता. याविषयी मत मांडताना अजित पवार म्हणाले होते की, 'लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण लावण्यांच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात लावण्यांना बंदी आहे. याची सविस्तर माहिती मी घेणार आहे. आपली परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन.'

त्यानंतर गौतमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली होती. लोकांनी माझ्याकडून झालेल्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सर्व चुका सुधारलेल्या आहेत. त्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात मी अश्लिल डान्स किंवा हातभाव केलेले नाहीत. परंतु तरीदेखील माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा, असं म्हणत गौतमी पाटीलने म्हटले होते.

IPL_Entry_Point

विभाग