मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत...; उर्फीचे ट्वीट व्हायरल

Urfi Javed: सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत...; उर्फीचे ट्वीट व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 22, 2023 07:48 PM IST

Urfi Javed: उर्फी जावेदने दिल्लीत घडलेला वाईट प्रकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या...

उर्फी जावेद
उर्फी जावेद (HT)

अभिनेत्री उर्फी जावेद ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या रिविलिंग लूकमुळे तर कधी केलेल्या वक्तव्यामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच उर्फीला दिल्लीत एक वाईट अनुभव आला आहे. उर्फीने बुक केलेल्या कॅब ड्रायव्हरने चक्क तिचे सामान पळवले. उर्फीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच उबर कंपनीकडे याबाबत तक्रार केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उर्फीने सोशल मीडियावर बुक केलेल्या कॅबचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये त्या कॅब ड्रायव्हरचे नाव आणि फोटो दिसत आहे. हे शेअर करत तिने, 'मला उबर कंपनीच्या कॅब सेवेबाबत अतिशय वाईट अनुभव आला आहे. मी दिल्लीत असताना सहा तासांसाठी कॅब बुक केली होती. एअरपोर्टवर जाण्यापूर्वी मी जेवणासाठी एका ठिकाणी थांबले. त्यावेळी ड्रायव्हर माझ्या सामानसह फरार झाला. मी त्याला अनेक फोन केले पण तो परत यायला तयार नव्हता' असे म्हटले.
वाचा: ट्रोल करणाऱ्यांना स्वरा भास्करच्या पतीचे सडेतोड उत्तर, 'हिंदू-मुस्लिम...'

पुढे ती म्हणाली, 'कॅब ड्रायव्हर परत येत नाही हे पाहून मी शेवटी एका मित्राला सांगितले. मुलाचा आवाज ऐकताच तो कॅब ड्रायव्हर घाबरला आणि तासाभराने परत आला. तो जेव्हा परत आला तेव्हा नशेत होता. हे पाहून मला धक्काच बसला. त्या नीट चालताही येत नव्हते. पार्किंगमध्येच होतो असे कारण दिले. माझ्या मित्राने इतक्या वेळा फोन केला तरी तो जागेवरुन हालला नव्हता. उबर हे महिलांसाठी सुरक्षित नाही. आधी ड्रायव्हर सामान घेऊन फरार होतो आणि दोन तासांनंतर नशेत परत येतो.'

उर्फीचे हे ट्वीट पाहून उबर कंपनीने तिची माफी मागितली आहे. तसेच त्या ड्रायव्हरवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे.

IPL_Entry_Point

विभाग